राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज
Featured

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

Dhananjay Shinde

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भ आणि कोकणात आठ मे पासून 11 मे पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तुरळक तर काही ठिकाणी विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात आज आठ मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वुक्त करण्यात आला आहे. तर नऊ तारखेला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाचा ईशारा देण्यात आला. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा ईशारा आहे. माञ कोकण गोव्यात हवामान कोरडे राहील.

दहा तारखेला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर अकरा तारखेला विदर्भात काही ठिकाणी तर कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर या दोन दिवशी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाचा ईशारा देण्यात आला आहे. दहा आणि अकरा तारखेला पुणे आणि पुण्याच्या परिसरात दुपारनंतर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्‍यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com