पाणी बचतीसाठी आता ‘अटल भूजल योजना’
Featured

पाणी बचतीसाठी आता ‘अटल भूजल योजना’

Sarvmat Digital

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल योजनेची घोषणा केली. यावेळी त्यांनी पाणी बचतीचा संदेश दिला. तसेच त्यांनी शेतकरी, तरुणांना पाणी वाचवा असे आवाहन केले.

दिल्लीच्या विज्ञान भवनात त्यांनी अटल भूजल योजनेचा शुभारंभ केला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपा नेत्यांनी सदैव अटल स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.

केंद्र सरकारने अलीकडेच अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीला मंजूरी दिली आहे. पाच वर्षांच्या (2020-21 ते 2024-25) काळात सहा हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे. या योजनेचा लाभ सुरूवातीला 6 राज्यांना होणार आहे. यात आठ हजार 350 ग्रामपंचायती आणि 78 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. देशातील मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र आणि राजस्थान या सहा राज्यांचा यामध्ये समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com