भूजल पातळीत घट होत राहिल्यास 2030 मध्ये जलसंकट

भूजल पातळीत घट होत राहिल्यास 2030 मध्ये जलसंकट

सार्वमत

नीती आयोगाच्या अहवालातून इशारा
नवी दिल्ली – भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने घटत आहे. त्यावर नियंत्रण आणले नाही, तर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल. 2030 मध्ये लोकांना पिण्याचे पाणीसुद्धा मिळणार नाही, असा इशारा नीती आयोगाने आपल्या अहवालातून दिला आहे. देशात 60 कोटी जनता पाण्याची कमतरता सहन करीत आहेत, 2030 पर्यंत देशात पाण्याची मागणी उपलब्ध पाणीपुरवठा पाहता दुप्पट होईल, ाण्याविषयी कुठलेही नियम-कायदे नाहीत. बाटलीबंद पाणी विकणार्‍या कंपन्या अनिर्बंधपणे पाण्याचा उपसा करीत आहेत. सातत्याने घट होत असलेली भूजलपातळी 2030 पर्यंत देशातील सर्वांत मोठ्या संकटाच्या रूपाने पुढे येईल. घटत्या भूजल पातळीविषयी भूवैज्ञानिक आणि पर्यावरणवाद्यांनीही गंभीर चिंता व्यक्त केली असून, राष्ट्रीय हरीत लवादाने शक्य तितक्या लवकर मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी, असे सुचविले आहे.

संवेदनशील क्षेत्रांमध्ये भूमीगत जल काढण्यासाठी अनुमती का दिली जात आहे. देशभरात बेसमेंट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूमीगत पाण्याचा उपसा होत आहे. त्यासाठी आठ ते दहा मीटरपर्यंत खोदकाम केले जाते. खोदकामातून निघणारे पाणी वाया जात आहे, असे अहवालात नमूद आहे.

नियम हवे – बेसमेंटच्या खोदकामाचा स्तर स्थानिक प्रशासन, बांधकाम व्यवसायिक किंवा घरमालकातर्फे नाही, तर केंद्रीय भूजल प्राधिकरण निश्चित करेल. किती खोलपर्यंत बेसमेंट तयार केले जाऊ शकेल हे प्राधिकरण ठरवेल. बेसमेंटचा स्तर भूजल पातळीपेक्षा वर असायला हवा. त्यामुळे भूजलाची बचत होईल असे नीती आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com