गोदाम फोडून 18 लाखांचे टायर लंपास
Featured

गोदाम फोडून 18 लाखांचे टायर लंपास

Sarvmat Digital

नवनागापूर एमआयडीसीमधील प्रकार

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर एमआयडीसीतील एमआरएफ कंपनीचेे गोदाम फोडून चोरट्याने 17 लाख 98 हजार 286 रुपये किंमतीचे 206 टायर लंपास केले आहे. याप्रकरणी गोदामाचे मालक शिवचरण दास दिनाबंधू दास (वय- 41 रा. नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी, नवनागापूर येथे शिवचरण दास दिनाबंधू दास यांचे एमआरएफ कंपनीच्या टायरचे गोदाम आहे. शुक्रवार (दि.6) सायंकाळी साडेसहा ते शनिवार (दि. 7) सकाळी सातच्या दरम्यान गोदामाच्या मागील बाजूची भिंत चोरट्यांनी फोडून 120 ट्रकचे व 86 दुचाकीचे असे 17 लाख 98 हजार 286 रुपयांचे 206 टायर चोरट्यांनी लंपास केले. चोरट्यांनी गोदाम फोडून रात्रभर लाखो रुपयांच्या टायरची वाहतूक करून बाजूला काटवनात आणून टाकले. या काटवनातूनच त्यांनी वाहनाने टायर लंपास केले असल्याचा संशय आहे. काही टायर त्याठिकाणी मिळून आले.

गोदाम फोडून चोरट्यांनी रात्रभर टायरची वाहतूक केली. 206 टायरची वाहतूक करून ते एका वाहनात भरून घेऊन गेले असावेत. सकाळी स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने बाकी टायर तेथेच सोडून चोरटे फरार झाले. यामुळे बाकी टायर वाचले. तरी चोरटे सुमारे 18 लाखांचे टायर चोरण्यात यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बोरसे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com