विखे कारखान्याच्या ऊर्जा प्रकल्पाला भीषण आग
Featured

विखे कारखान्याच्या ऊर्जा प्रकल्पाला भीषण आग

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

लोणी (प्रतिनिधी) – पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने बिओटी तत्वाने चालविण्यास दिलेल्या ऊर्जा प्रकल्पास भुसा पेटल्यांमुळे आग लागल्याचा खुलासा कारखान्याचे कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे यांनी केला. यामध्ये जखमी झालेल्या कामगारांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्याने वीज निर्मितीसाठी सदर प्रकल्प एका कंपनीस चालविण्यात दिलेला आहे. प्रकल्पात सकाळी वेल्डींगचे काम सूरू असताना आजूबाजूस पडलेल्या भुश्यावर पडलेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागली. प्रवरा कारखान्यासह संगमनेर, अशोक, कोळपेवाडी, संजीवनी या कारखान्यांसह राहाता, शिर्डी, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निश्माक पथकाने आग आटोक्यात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. या आगीत झालेल्या नुकसानीची माहिती चौकशी नंतर समोर येईल, असे स्पष्ट करुन या घटनेत जखमी झालेल्या कामगारांवर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले असून कारखाना त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान कारखान्याचे चेअरमन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आग लागल्यानंतर लगेच घटनास्थळी येऊन आग विझवण्याकामी मदत करत जखमीच्या उपचारासाठी तातडीने सूचना दिल्या. प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

Deshdoot
www.deshdoot.com