यूपीएससी पूर्व परीक्षा लांबणीवर
Featured

यूपीएससी पूर्व परीक्षा लांबणीवर

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सार्वमत

मुंबई – केंद्रीय लोकसेवा आयोगाची(यूपीएससी) पूर्व परीक्षेची नवी तारीख येत्या 5 जून रोजी जाहीर केली जाणार असल्याची माहिती यूपीएससीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

दरम्यान यूपीएससीची परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 31 मे 2020 रोजी होणार होती. पण करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊन स्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

ही परीक्षा कधी घेतली जाणार याबाबत बुधवारी 20 मे रोजी माहिती देणार असल्याचे आयोगाने जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी ही माहिती देण्यात आली. करोनासंदर्भातल्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर 5 जून रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर या तारखेची घोषणा करण्यात येईल.

Deshdoot
www.deshdoot.com