दुचाकी-डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Featured

दुचाकी-डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Balvant Gaikwad

चाळीसगाव-भडगाव रोडवर वाघळी गावाच्या पुढे दुचाकीला डंबरने समोर धडक दिल्याने, दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे, दोघे मयत शहरातील पवारवाडी परिसरातील अब्दुल रहमान नगर येथील रहिवासी आहेत.

मोहम्मद शाकीर अली मो. जाकीर अली(25), शमीन हुसैन जमीन गमी हुसैन(27) अशी मयतांची नावे आहेत. हि घटना दुपारी 1.30 वाजेच्या दमर्‍यान घडली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत मो.शाकीर अली मो. जाकीर अली(25), शमीन हुसैन जमीन गमी हुसैन(27) हे दोघे ही दुचाकीने(एमएच,19.ऐ.क्यु 3809) ने चाळीसगाव-भडगाव रोडवरुन चाळीसगाव कडून भडगावकडे जात असताना, तालुक्यातील वाघळी गावाच्या पुढे बहोराबा मंदिरा जवळ समोरुन भडगावकडून-चाळीसगावकडे भरधाव वेगाने येणार्‍या डंबरने(एमएच,43.बीपी,0659) त्यांना जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे तरुण लांब अतंरावर फेकले गेले.

Deshdoot
www.deshdoot.com