धुळे : मोटार सायकल-ट्रक अपघातात दोघे ठार

धुळे : मोटार सायकल-ट्रक अपघातात दोघे ठार

शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर धुळे रस्त्यावर मोटार सायकल आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन 2 जण ठार झालेत, अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. ही घटना 8.30 वाजेच्या सुमारास घडली.

मृतांमध्ये शंकर भगवान कोळी (वय 19) आणि निंबा देवचंद कोळी (42) यांचा समावेश आहे. नातेवाईकांकडून जेवण आटोपून ते घराकडे न्याहळोदला जात असताना दोंडाईचा जवळ त्यांच्या मोटार सायकलची धडक झाली.

त्यात ते जागीच ठार झालेत. दोंडाईचा पोलीस घटनास्थळी पोहचले तोवर ट्रक चालक फरार झाला. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉ ललीतकुमार चंदरे यांनी त्यांना मृत घोषित केले.

AD
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com