दुधाच्या टेम्पोतून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक
Featured

दुधाच्या टेम्पोतून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक

Dhananjay Shinde

सार्वमत
पुणे (प्रतिनिधी) – पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात चक्क एका दुधाच्या टेम्पोतून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक केली जात असताना हा टेम्पो पोलिसांनी कात्रज भागात पकडला आहे.

भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांनी काल रात्री कात्रज परिसरात टेम्पोतील 29 हजार रुपयांचे बिअरचे 12 बॉक्स पकडले आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालकाला ताब्यात घेत टेम्पो जप्त करून भारती विद्यापीठ पोलिसांकडे देण्यात आला आहे.

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा जसे दूध, भाजीपाला, किराणा वस्तू आणि मेडिकल सेवा सुरू असून त्यांना पोलिसांकडून पास देण्यात आले आहेत. तर जागोजागी पोलिसांची गस्त देखील सुरू आहे. काल रात्री भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस कात्रज घाट परीसरात गस्त घालत होते.

त्यावेळी पोलीस हवालदार पारखी, तोंडे यांच्यासह पोलीस नाईक भिंगारे यांना एक दुधाचा टेम्पो संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबविले. चालकाकडे चौकशी केली असता तो खोट बोलत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये दुधाच्या कॅरेटच्या पाठीमागे ठेवलेले 29 हजार रुपयांचे 12 बिअर बॉक्स सापडले.

Deshdoot
www.deshdoot.com