पोलिसांना आमची माहिती सांगितली तर जिवे मारू
Featured

पोलिसांना आमची माहिती सांगितली तर जिवे मारू

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

कोठडीतील सराफाच्या मुलास धमकी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – सध्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी पोलीस कोठडीत असणार्‍या सराफ रामेश्वर माळवे याच्या मुलास येथील तीन जणांनी गुन्ह्याबाबत पोलिसांना आमची माहिती द्यायची नाही, असे म्हणत शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तीन जणांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 14 जानेवारी रोजी रात्री आरोपी रामेश्‍वर माळवे याचा मुलगा अभिजीत रामेश्‍वर माळवे हा त्यांच्या सोनार गल्ली येथील घरी असताना जाकीर बनेमिया शेख, सलमान जाकीर शेख, अरबाज जाकीर शेख (सर्व रा- लोणार गल्ली, वॉर्ड नं. 5) यांनी घरी येवून तुझे वडील शहर पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यात पोलिस कस्टडीमध्ये असून, तुम्ही आमच्याकडून उसने घेतलेले 30 लाख रुपयाबाबत तुमच्या वडिलांना सांगावे, पोलीस स्टेशनला गुन्ह्याबाबत आमची माहिती द्यायची नाही, असे म्हणून अभिजीत यास वाईट शिवीगाळ केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अभिजित माळवे याने दिलेल्या फिर्यादीवरुन भादंवि. कलम 304, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील हे करत आहेत. या धमकीच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com