केंद्र सरकारने तातडीने निर्यात बंदी उठवावी; नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन
Featured

केंद्र सरकारने तातडीने निर्यात बंदी उठवावी; नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

चांदवड | प्रतिनिधी

कांदा अत्यंत कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दि. १५ मार्चच्या मुहूर्ताची वाट न पाहता केंद्र सरकारने तातडीने निर्यात बंदी उठवावी तसेच बाजार हस्तक्षेप योजना लागू करून कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँँड. रविंद्र पगार यांनी केली आहे.

दि. १५ मार्चच्या मुहूर्ताची वाट न पाहता केंद्रातील भाजप सरकारने तातडीने निर्यात बंदी उठवावी तसेच बाजार हस्तक्षेप योजना लागू करून कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील चांदवड येथील चौफुलीवर संतप्त शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन केले.

कांद्याच्या निर्यात धोरणांबाबत केंद्रातील भाजप सरकारच्या धरसोड वृत्तीमुळेच जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याला व्यापाऱ्यांकडून मागणी कमी होत आहे. कांद्याला उप्तादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अस्मानी संकटामुळे हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आलेल्या सुलतानी संकटाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता केंद्रातील भाजप सरकारने तातडीने कांद्यासह सर्व शेतमालाला हमीभाव जाहीर करून दिलासा द्यावा अन्यथा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँँड. रविंद्र पगार यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांचा कांदा व अन्य शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसून सरकार कांदा व शेतमालाच्या भावाबाबत काहीही निर्णय घेत नसल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड यांनी यावेळी बोलतांना केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अँँड. रविंद्र पगार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, सभापती संजय बनकर, पुरुषोत्तम कडलग, प्रेरणा बलकवडे, राजेंद्र जाधव, डॉ. योगेश गोसावी, विजय पवार, राजेंद्र सोनवणे, संदीप पवार, साहेबराव मढवई, विजय पाटील, भास्कर भगरे, नुतन आहेर, शहाजी भोकनळ, प्रकाश शेळके, खंडेराव आहेर, सुनिल कबाडे, यु.के.आहेर, दत्ता वाघचौरे, विजय जाधव, पंडित निकम, अश्विनी मोगल, सलिम रिझवी, उषा बच्छाव आदींची भाषणे झाली.

१. दि. १५ मार्चच्या मुहूर्ताची वाट न पाहता केंद्र सरकारने तातडीने निर्यात बंदी उठवावी तसेच बाजार हस्तक्षेप योजना लागू करून कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने यावेळी करण्यात आली.
२. रास्ता रोको आंदोलन प्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करून पोलीस वाहने आणून ठेवल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
३. कांद्याच्या माळा गळ्यात घालून जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या नेतृत्वाने रास्ता रोको सुरु असतांना आंदोलकांकडून केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.
४. रास्ता रोको सुरु असतांना लांबच लांब अशा वाहण्याच्या रांगा लागलेल्या असतांना आंदोलकांमार्फत शालेय विद्यार्थी व रुग्णवाहिकांना सोडण्यात येत होते.
यावेळी कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे याबरोबरच केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी योगेश पाटील, अनिल काले, महेश देशमाने, अरुण न्याहारकर, नवनाथ आहेर, रिझवान शेख, योगेश आहेर, सुनील आहेर, राहुल सालगुडे, रामा पाटील, प्रफुल्ल पवार, आल्ताफ तांबोळी, जगदीश पवार, तुकाराम सोनवणे, मतीन घासी, सतीश सोनवणे, किरण आहेर, अपर्णा देशमुख, गौरव कोतवाल, जगन्नाथ खेमनर, साधना पाटील, विजय गांगुर्डे, बापू शिंदे, सुरेखा नागरे, सोमनाथ अहिरराव, निलिमा काळे, आकाश भामरे, जयेश अहिरे, मंगल नागरे, शेखर पवार, अश्वीनी मोगल, ज्ञानेश्वर पगार, संध्या आहेर, रेवन ठाकरे, शिवजी जगताप, कल्पना रामराजे, राजेंद्र ठोंबरे, म्हसु गागरे, आशा देवडे, भाऊसाहेब सूर्यवंशी, जया कुंभार्डे, संदिप जगताप, उषा खैरे, सुनील राठोड, रंजना चतुर, बाबुराव पवार, माधव पवार, अश्विनी ठाकरे, रतन ठोक, भिका आहेर, गोरख शिंदे, उत्तम कोल्हे, सुधाकर थोरमीरे, तौसीफ मनियार, डॉ. मुझीब रहेमान, महेंद्र हिरे, निलेश गटकळ, सुभाष शेलार, संदीप वाघ, अनिल पवार, नितीन सोनवणे आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com