मतदार ओळखपत्र पडताळणी कार्यक्रमावर शिक्षकांचा बहिष्कार

मतदार ओळखपत्र पडताळणी कार्यक्रमावर शिक्षकांचा बहिष्कार

गणोरे (वार्ताहर) – अकोले तालुक्यातील मतदान केंद्रावर बी. एल. ओ. म्हणून काम करणार्‍या शिक्षकांनी इ. व्ही. पी. पी. द्वारे करावयाच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. या संदर्भातले निवेदन राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात आले असून, त्याची प्रत तालुका तहसीलदार यांनाही देण्यात आली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी दिल्या जाणार्‍या आदेशाने काम करणारे स्थानिक मतदान केंद्रावरील बीएलओ यांना नव्याने इव्हीपीद्वारे काम करण्यासाठी आदेशित करण्यात आले होते. या संदर्भाने तालुक्यातील सर्व बी. एल .ओ. प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन यासंदर्भात निवेदन तहसीलदार यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सदरची कामे करताना शिक्षकांना विद्यार्थ्यांपासून बराच काळ बाहेर राहावे लागते. त्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. तर अनेकदा सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत ही कामे सातत्याने करावे लागतात. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. तीन ते चार महिने या कामासाठी शिक्षकांना बाहेर राहवे लागणार असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

ज्या शिक्षकांना ही कामे दिली जाणार आहेत, त्या शिक्षकांना शिक्षकांच्या जागेवर काम करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात यावे. तसेच सदरचे काम प द्वारे करावयाचे असल्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांना निवडणूक आयोगाच्या वतीने मोबाईल पुरविण्यात यावा. मोबाईल डेटा उपलब्ध करून द्यावा. तसेच अकोले तालुका अत्यंत दुर्गम व डोंगराळ असल्याने अनेक ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नाही त्याचाही परिणाम कर्मचार्‍यांना सोसावा लागणार आहे.

मतदान केंद्रावरती बीएलओ म्हणून काम करताना शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे असताना एक राष्ट्रीय काम म्हणून शिक्षक हे काम प्रामाणिकपणे करत आहे. अशा परिस्थितीत ई.व्ही.पी. हे काम करताना मोबाईल द्वारे करावे लागणार आहे. या मतदारांना देण्यात आलेल्या मतदार ओळखपत्राचा क्रमांक पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच त्याचे निवासस्थान हेदेखील पडताळणी होणार आहे. अशा परिस्थितीत नागरिक ज्या ठिकाणी राहतात.

तिथे नेटवर्क नसेल, अधिक अंतरावर राहत असल्यास त्या नागरिकांची भेट घेणे कठीण होते. गावाकडे असलेल्या मोठ्या प्रमाणावर मजुरी, कर्मचारी हे आपापल्या कामाला जात असल्यामुळे सदरचे काम हे सकाळी किंवा सायंकाळी अशा स्वरूपात करावे लागणार आहेत. त्यातून अनेक नागरिक बाहेरगावी गेले असतील स्थलांतर झाले असेल तर अशा अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे हे काम करताना शिक्षकांच्या नाकी नऊ येणार आहेत.

पहिल्या सत्रामध्ये कामाचे दिवस कमी भरले असतानाच त्यावेळी निवडणूक प्रक्रिया आणि द्वितीय सत्रामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने शिक्षकांची होणारी धावपळ शालेय शिक्षण विभागाची असणारे प्रशिक्षण, विविध स्पर्धा लक्षात घेतात शिक्षकांना अध्ययन अध्यापन व मूल्यमापनासाठी कमी कालावधी असल्याने सदरची कामे शिक्षकांच्या माथी मारू नयेत अशाप्रकारची विनंती शिक्षकांच्यावतीने प्राथमिक शिक्षक संजय नवले यांनी केली आहे. तसेच हे काम महिला कर्मचार्‍यांना देण्यात येऊ नये. मुख्याध्यापक पदाचा कार्यभार असणार्‍या शिक्षकांना यातून वगळण्यात यावे.

मागील काळातील बीएलओ असलेल्या कर्मचार्‍यांचे मागील काळातील मानधन राजपाल देण्यात यावे. एक हजारापेक्षा अधिक मतदार असलेल्या केंद्रावर बीएलओ यांना सहायक कर्मचार्‍यांची नियुक्ती करून द्यावी. या कामासाठी ग्रामपंचायत स्तरावर संगणक सुविधा, इंटरनेट व कर्मचारी उपलब्ध असल्याने त्यांच्याकडून काम करून घ्यावे किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली आहे. शिक्षकांवर हे काम करण्याची सक्ती केल्यास मागणी केल्याप्रमाणे साधनसुविधा उपलब्ध करून दिली तरच सदरचे काम केले जाईल असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सध्या बीएलओ म्हणून मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या महिला व पुरुष कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com