Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedचाळीसगाव : देवळी येथे विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

चाळीसगाव : देवळी येथे विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

चाळीसगाव  – 

तालुक्यातील देवळी येथे मुले घरात झोपेत असताना 28 वर्षीय विवाहीतेने मध्यरात्री घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना गुरुवारी संकाळी उघडकीस आली. याप्रकरणी चाळीसगाव मेहुणबारे पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

देवळी येथील ललीता सुनील बोरसे(28) या विवाहीतेचे पती काल रात्री पाटाच्या कामावर गेले होते. घरी दोन्ही मुले व ललीता बोरसे ह्याच होत्या.

रात्री मुले झोपलेले असतांना ललीता बोरसे यांनी घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.आज दि.30 रोजी पहाटे 1 वाजेच्या पुर्वी ही घटना उघडकीस आली.

मुले झोपेतून उठल्याने हा खळबळजनक प्रकार घडला. गळफास घेतलेल्या महिलेस तिचा पती व शेजारच्यांनी गळफास सोडवून गावातील खाजगी डॉ्क्टरांकडे तपासणीसाठी नेले असता विवाहीता मृत झाल्याचे सांगितले.

याप्रकरणी दगडू लक्ष्मण बोरसे यांनी दिलेल्या फिर्यांदीवरुन मेहूणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. मिलींद शिंदे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या