Friday, April 26, 2024
Homeनगरसाखर उद्योगाच्या समस्यांवर तात्काळ बैठक घ्या

साखर उद्योगाच्या समस्यांवर तात्काळ बैठक घ्या

साखर संघाच्या अध्यक्षांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे साखर उद्योगाच्या विविध समस्यांवर विचारविनिमय करण्यासाठी तात्काळ एक बैठक बोलावण्याचा आग्रह केला.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखालील एका प्रतिनिधी मंडळाने नुकतीच मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. श्री. दांडेगावकर म्हणाले की, सर्वच साखर उद्योगातील हितधारकांची बैठक बोलावणे आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेमुळे नियमित बैठक़ झाली नाही. त्यामुळे यावर्षीच्या ऊस गाळप हंगामाला उशीर झाला आहे आणि कारखान्यांना छोट्या आणि मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने सात मागण्या केल्या आहेत आणि त्यातील अधिकांश पैसे आणि कर्ज याच्याशी संबंधित आहेत. वित्तीय मागण्या अधिक महत्त्वाच्या आहेत, कारण साखर कारखान्यांचा दावा आहे की, उच्च उत्पादन मूल्य आणि साखरेचे कमी विक्रीमूल्य यामुळे साखर कारखाने संकटात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ राजकीय नेते ग्रामीण भागातील असून त्यांना साखर क्षेत्र आणि शेतकर्‍यांच्या समस्यांची जाणीव आहे. साखर कारखाने शेती कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल आशादायी असून त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या साखर उद्योगालाही मदत होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या