सहा साखर कारखान्यांच्या निवडणूका 1 मे नंतर
Featured

सहा साखर कारखान्यांच्या निवडणूका 1 मे नंतर

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणूका तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यात निवडणूक नामनिर्देशन कार्यक्रम सुरू न झालेल्या सहकारी संस्था, बँका, साखर कारखान्यांचा समावेश होता. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सहा कारखान्यांचा समावेश होता. सरकारने दिलेली मुदत 1 मे रोजी संपणार असल्याने या सहा कारखान्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे.

1 मे नंतर निवडणुका होणार्‍या साखर कारखान्यांत सोनई येथील मुळा साखर कारखाना, भेंडा येथील ज्ञानेश्‍वर साखर कारखाना, पाथर्डीमधील वृध्देश्‍वर साखर कारखाना, श्रीरामपूरचा अशोक साखर कारखाना, श्रीगोंद्याचा नगवडे आणि कुकडी साखर कारखान्यांचा यात समावेश आहे. यातील मुळा कारखान्यांची मतदार यादी अंतिम झाली असून ज्ञानेश्‍वरची यादी प्रसिध्द होणे बाकी आहे. वृध्देश्‍वर कारखान्यांच्या अंतिम मतदार यादीवर हरकतीवर सुनावण्या सुरू आहेत.

अशोक कारखान्यांच्या मतदार यादीवरील हरकतींवर सुनावण्या सुरू असून नागवडी कारखान्यांची हिच प्रक्रिया सुरू आहे. कुकडी कारखान्यांची अंतिम मतदार यादीवर हरकती मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर संगमनेर साखर कारखान्यांसाठी 1 मार्चला तर विखे कारखान्यांसाठी 29 फेबु्रवारीला मतदान होणार आहेत.
……………….
गाळप हंगाम अंतिम टप्प्यात
जिल्ह्यात यंदा ऊसाच्या टंचाईमुळे गाळप हंगाम लवकर आटोपणार आहे. डिसंेंबर महिन्यांत सुरू झालेला केदारेश्‍वर हा गाळप न करताच सात दिवसांत बंद करण्यात आला आहे. उर्वरित कारखान्यांनी गाळप केले असून जिल्ह्यात 41 लाख 34 हजार 846 मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले असून यातून 40 लाख 88 हजार 425 क्विंटल साखर आयात झालेली आहे. जिल्ह्याचा साखर उतारा देखील 9.86 निघालेला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com