ज्ञानेश्वर कारखाना निवडणूक : चौथ्या दिवसाअखेर 101 उमेदवारी अर्ज दाखल
Featured

ज्ञानेश्वर कारखाना निवडणूक : चौथ्या दिवसाअखेर 101 उमेदवारी अर्ज दाखल

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

भेंडा (वार्ताहर) – येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 77 तर आज अखेर 101 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी तिसर्‍या दिवशी दाखल झालेले गटनिहाय उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती प्रतिनिधी मतदार संघ-शेवगाव गट- पाटील शिवाजीराव किसनराव, खेडकर भास्कर मारूती, थोरात कारभारी त्रिंबक, ढोरकुले सोपान विलास, पारनरे बप्पासाहेब काकासाहेब, ढोरकुले कृष्णा मोहनराव, शहरटाकळी गट- गवळी संभाजी शिवाजी, काशीद लक्ष्मण विठ्ठल, नर्‍हे नामदेव दगडू, खरड संदीप कृष्णनाथ, शिंदे संजय सदाशिव, कुकाणा गट – म्हस्के नारायण कारभारी, म्हस्के रघुनाथ मारुती, अभंग पांडुरंग गमाजी, गव्हाणे विठ्ठल तात्याबा, गरड अरुण अशोक, नवले गोरक्षनाथ सुखदेव, पाठक ईश्वर गोविंद, नवले उद्धव श्रीपती, नवले काशिनाथ मारुती (2 अर्ज), नेवासा गट- जाधव अजित तेजसिंह, लोखंडे शंकर मुरलीधर, लंघे विठ्ठलराव वकिलराव, वडाळा गट- कर्डीले उद्धव जालिंदर, मुंगसे बाजीराव शंकर, पटारे जनार्दन भाऊसाहेब (2 अर्ज), भगत मोहन मारुती, दहातोंडे ज्ञानदेव कान्हू, कांगुणे भाऊसाहेब सोन्याबापू, बनसोडे लक्ष्मण जयवंत, निकम रावसाहेब सहादू, मुंगसे चंद्रकांत भानुदास, ढोरजळगाव गट- भुसारी बबनराव मुरलीधर, लांडे सुधाकर बन्सी, पिसोटे बबनराव रामभाऊ, कराळे रमेश निवृत्ती, काळे आबासाहेब जगन्नाथ, गटकळ भानुदास यादव, उगले बाबासाहेब साहेबराव, पाटेकर देविदास आसाराम, घाडगे साहेबराव हरिभाऊ, फटांगरे संभाजी तुकाराम, उत्पादक-बिगर उत्पादक सहकारी संस्था- भुसारी बबनराव मुरलीधर, सौ.लांडे रागिनी सुधाकर,नवले काशिनाथ मारुती. * महिला प्रतिनिधी- लांडे रागिनी सुधाकर, पिसोटे कुसुम बबन, गवळी सुनंदा शिवाजीराव, जगदाळे ताराबाई हनुमान, पाटील संगीता शिवाजी, काळे सुमन दत्तात्रय, पटारे रेणुका जनार्दन, मिसाळ लताबाई अशोक, कांगुणे शारदाबाई भाऊसाहेब, ढोरकुले यमुनाबाई मोहनराव, इतर मागासवर्गीय मतदार संघ- भुसारी बबनराव मुरलीधर, म्हस्के नारायण कारभारी, लांडे रागिनी सुधाकर, पिसोटे बबन रामभाऊ, फुलारी कारभारी लक्ष्मण, लोखंडे शंकरराव मुरलीधर, काळे दत्तात्रय त्रिंबक, पटारे जनार्दन भाऊसाहेब (2 अर्ज), अभंग पांडुरंग गमाजी, शिंदे संजय सदाशिव, खरड बाळासाहेब त्रिंबक, गटकळ भानुदास यादव, काळे आबासाहेब जगन्नाथ, नवले उद्धव श्रीपती, नवले काशीनाथ मारुती, ढोरकुले यमुनाबाई मोहनराव, अनुसूचित जाती जमाती-(या मतदार संघातून अद्याप एक ही उमेदवारी अर्ज दाखल नाही), विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदार संघ- खेडकर भास्कर मारुती, मिसाळ लताबाई अशोक, बनसोडे लक्ष्मण जयवंत आदींनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवसाअखेर एकूण 101 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com