मुळा कारखाना निवडणूक : अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी  69 उमेदवारी अर्ज दाखल
Featured

मुळा कारखाना निवडणूक : अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 69 उमेदवारी अर्ज दाखल

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नेवासा (तालुका वार्ताहर) – मुळा कारखाना निवडणूकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 69 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे एकूण 21 जागांसाठी 186 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
मुळा कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी विक्रमी 69 अर्ज दाखल झाले. एकूण 21 जागांसाठी 186 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गटनिहाय दाखल झालेल्या अर्जांची संख्या पुढील प्रमाणे- सोनई 17, घोडेगाव 18, खरवंडी 26, करजगाव 22, नेवासा 21, प्रवरा संगम 17, सहकारी संस्था गट 4, अनुसूचित जाती गट 6, महिला राखीव गट 20 व इतर मागास प्रवर्गासाठी 18 तसेच भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्गासाठी 17 असे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने नेवासा तहसील कार्यालयात करोनाचे सावट असतानाही उमेदवारी अर्ज भरणार्‍यांची व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली. 186 उमेदवारांमध्ये मध्ये विद्यमान संचालक मंडळातील जवळजवळ सर्वच संचालकांनी पुन्हा एकदा संचालक पदासाठी अर्ज भरलेले आहेत आहेत. त्यात प्रमुख यावेळी जलसंपदा मंत्री नामदार नामदार शंकराव गडाख सोनई गट व सहकारी संस्था सभासद राखीव गटातून अशा दोन ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय विद्यमान चेअरमन नानासाहेब तुवर यांचा देखील सहकारी संस्था मध्ये अर्ज आहे तसेच माजी चेअरमन जबाजी फाटके यांचे चिरंजीव आबासाहेब फाटके यांनी देखील याठिकाणी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी निवडणुकीमध्ये विरोधकांच्या हालचाली दिसत नसल्याने सत्ताधारी पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी झालेली दिसत आहे. नेवासा शहरातून उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, प्रवरासंगम गटातून बाळासाहेब दादा पाटील, महिला गटातून नंदा सोनवणे, ताई निमसे, विमल सोनवणे, घोडेगाव गटातून राजेश नानासाहेब रेपाळे, दिलीप शंकर लोखंडे, खरवंडी गटात अजित फडके, मुकुंद भोगे, बापुसाहेब शेटे, करजगाव गटातून संजय पोपटराव जंगले, प्रवरासंगम गटात परसैय्या राजू अशोक हारदे, रामदास कोरडे, राजकुमार रंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
सदर उमेदवारांच्या अर्जाची छाननी 23 मार्च रोजी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 7 एप्रिल आहे. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सुराणा यांनी दिली. गटनिहाय उमेदवार सोनई गट- निमसे भाऊसाहेब जगन्नाथ, जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य ना. शंकरराव यशवंतराव गडाख, येळवडे जालींदर गोरक्षनाथ, बेल्हेकर बाबासाहेब कुसनाथ, विरकर परसराम गहिनाजी, रशिनकार किसन गोविंद, घोडेगाव गट- चव्हाण बाळासाहेब जिजाबा, सोनवणे भास्कर रामदास, ढेरे बन्सी मारुती, बारहाते भाऊसाहेब माधव, सोनवणे संतोष अरुण, शेळके नामदेव विश्वनाथ, खरवंडी गट- आहेर संजय गंगाधर, सोनवणे शेषराव केशव, सावंत भाऊसाहेब तुकाराम, भोगे मुकुंद शिवाजी, झिने सिताराम हरिभाऊ, सय्यद नूरमहंमद बडेमिया, भाकड आबासाहेब अंबादास, शेटे बापूसाहेब शंकर, करजगाव गट- जंगले राजेंद्र दगडू, टेमक चंद्रकांत भानुदास, जाधव,परसराम दाजी, औटी केशव भाऊसाहेब, जंगले संजय पोपटराव, प्रवारासंगम गट- गोरे बाळासाहेब आसाराम, कर्डिले कडूबाळ बाबुराव, कोरडे रामदास माधव, लंघे रामकुमार भिमराज, उंदरे ज्ञानेश्वर जनार्धन, हारदे अशोक शंकर, चावरे दत्तात्रय नरसिंग, परसैय्या राजू मुन्ना, सहकारी संस्था सभासद राखीव- जलसंधारण मंत्री शंकरराव यशवंतराव गडाख, अनु.जाती/अनु.जमाती राखीव- बोरुडे रत्नाकर किसन, गायकवाड कडूबाळ कचरू, गायकवाड सुनील शंकर, शेंडे विद्यादेवी भीमराज, कदम वृषाली ज्ञानेश्वर, महिला प्रतिनिधी करिता राखीव- सौ.मंदाबाई गोरक्षनाथ जाधव, जंगले अलका रंगनाथ, जाधव दामुबाई आपासाहेब, चिंधे स्मिता बापूसाहेब, जाधव विठाबाई द्वारकानाथ, कोलते मनीषा रमेश, ठोंबळे शशिकला रामचंद्र, लोखंडे हिराबाई गोरक्षनाथ, पोटे मिराबाई अशोक, दरंदले सुनंदा प्रल्हाद, इतर मागास करिता राखीव- बेल्हेकर बाबासाहेब कुसनाथ, होले पोपट एकनाथ, ठोंबळ भागचंद्र मुरलीधर, आहेर विठ्ठल जिजाबा, हारदे अशोक शंकर, सुकाळकर त्रिंबक काशिनाथ, भालके भाऊसाहेब हरिभाऊ, भटक्या विमुक्त जाती व जमाती- विरकर परसराम गहिनाजी, परदेशी बाळासाहेब भाऊलाल, परसैय्या राजू मून्ना, शेख खुर्शीदबी चाँद, विरकर पराजी नारायण, नेवासा गट- जाधव दामूबाई आप्पासाहेब, जाधव आत्माराम गिरीधर, शिंदे बापूसाहेब भाऊसाहेब, भंगे विक्रम देवराव, घावाटे अच्युत पंढरीनाथ, निलेश विठ्ठल पाटील, सुकळकर त्र्यंबक काशिनाथ, शिंदे संदीप बबन आदींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com