‘अशोका’मध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण
Featured

‘अशोका’मध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Gaurav Pardeshi

नाशिक | प्रतिनिधी

येथील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दुर्बिनीद्वारे किडनी काढून तिचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. किडनीच्या आजारात रुग्णाला दुसर्‍याची किंवा कुटुंबातील व्यक्तीची किडनी घेऊन प्रत्यारोपित करायची असल्यास पूर्वी ओपन सर्जरी केली जात असे. त्यामध्ये अवयवदात्यास मोठ्या प्रमाणात दुखापत होण्याचा धोका होता.

मात्र ‘अशोका’मध्ये दुर्बिनीद्वारे दात्याची किडनी काढून तिचे प्रत्यारोपनही याच पद्धतीने करण्यात आले. अशा पद्धतीने किडनी प्रत्यारोपित केल्यास रक्तस्त्राव कमी प्रमाणात होऊन जंतूसंसर्गाचा धोकाही उद्भवत नाही शिवाय ही वेदनारहित शस्त्रक्रिया असल्याने रुग्ण आणि दाता तत्काळ बरे होतात.

शस्त्रक्रियेत धोकाही कमी होतो आणि हॉस्पिटलमधील रुग्णांचा कालावधी कमी होऊन रुग्ण कमीत कमी दिवसात बरा होऊन घरातील जवाबदार्‍या पार पाडू शकतो, अशी माहिती मेडिकल डायरेक्टर डॉ. सुशील पारख, किडनी विकार तज्ज्ञ डॉ. नागेश अघोर, किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राधेश्याम चौधरी यांनी दिली. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत डॉ. चौधरी यांच्यासह न्यूरोसर्जन डॉ. किशोर वाणी, सीव्हीटीएस सर्जन डॉ. राहुल कैचे यांचे मोठे सहकार्य लाभले.

अशोका हॉस्पिटलमध्ये काकाने स्वत:ची किडनीदान करुन पुतण्याला जीवनदान दिले. आईने ममत्वाचे मूर्तीमंत उदाहरण ठरत मुलीला नवजन्म दिला. तर किडनीविकाराने ग्रस्त नातवाला आजीने वाढदिवसाची भेट म्हणून किडनी दान करत दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला.

Deshdoot
www.deshdoot.com