पॅनासॉनिकची यशोगाथा.!

पॅनासॉनिकची यशोगाथा.!

भांडवल किंवा शिक्षणावर यश अवलंबून नसते. निश्चित केलेले ध्येय गाठण्याबाबत आपण किती आतूर आहात आणि आत्मविश्वास किती आहे, यावर यश अवलंबून असते. जपानचे नामांकित उद्योगपती आणि पॅनासोनिक इलेक्ट्रॉनिक कंपनीचे सर्वेसर्वा कोनोसुके मात्सुशिता यांची यशोगाथा प्रेरणादायी आहे.

माझा जन्म जपानच्या एका लहान गावात झाला. माझे कुटुंब अतिशय गरीब होते. या कारणामुळेच मला वयाच्या नवव्या वर्षी शाळा सोडून एका दुकानावर काम लागले. काही वर्षानंतर मी वीज उपकरणे तयार करणाऱ्या कंपनीत काम मिळाले. तेथे काम करताना बल्ब आणि सॉकेटमध्ये रुची वाढली. म्हणून मी वीजेचे काम शिकण्यास सुरु केले. यावर मी रात्री स्वत:च प्रयोग करत असत. एक दिवस मी माझ्या कौशल्यावर आधुनिक स्वरुपाचा वीजेचा बल्ब आणि सॉकेट तयार केले. हे सॉकेट बाजारापेक्षा चांगल्या दर्जाचे होते. मात्र जेव्हा हे सॉकेट मी मालकाला दाखविले तेव्हा त्यांनी माझी टिंगल केली. हे उपकरण बाजारात टिकणार नाही, असे सांगितले. परंतु मला अनुभव नव्हता. माझ्याकडे आणि शिक्षण नसल्याने काही करु शकत नव्हतो. काही दिवसानंतर मी नोकरी सोडली आणि पत्नी व अन्य तीन मदतनीसाच्या आधारे गॅरेजमध्ये मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी सुरू केली. वीज उपकरणे आम्ही घरोघरी जावून विकायचो. दुकानदारांनी माझे उपकरण घेण्यास फारसा रस दाखविला नाही. परिणामी मला जगण्यासाठी घरातील फर्निचरही विकावे लागले. एक दिवस मला एक हजार सॉकेटचे ऑर्डर मिळाले. त्यानंतर उपकरणाची विक्री वाढू लागली. यानंतर मात्सुशिता कंपनीने मागे वळून पाहिले नाही.

१९२२ पासून मात्सुशिता इलेक्ट्रिक इंडिस्ट्रियल कंपनी दर महिन्याला बाजारात नवीन उपकरणे आणत होती. हे उपकरण अन्य उपकरणाच्या तुलनेत दर्जेदार होते. वीज उपकरण उत्तम गुणवत्तेचे आणि वाजवी किमतीत असावे, यावर माझा भर राहिला आहे. त्याकाळी मेणबत्ती आणि तेलापासून जळणारे लॅम्प हे सायकल लॅम्प म्हणून वापरले जात होते. ते दिवे बराच काळ चालायचे. मी बॅटरीने चालणारे सायकल लॅम्प तयार केले आणि ते कमालीचे यशस्वी ठरले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कंपनीची विक्री कमी झाली. परंतु मी कोणत्याही कर्मचाऱ्याला काढले नाही. उलट उत्पादन कमी केले. कर्मचाऱ्यांना कंपनी वाचवण्याचे आवाहन केले. परिणामी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. युद्धामुळे आमचे प्रचंड नुकसान झाले. मात्र युद्धानंतर वॉशिंग मशिन, राइस कुकर, एअर कंडिशनर आणि टिव्ही (यासाठी आमची कंपनी पॅनासॉनिक नावाने प्रसिद्ध आहे) बाजारात आणले. १९५० च्या दशकात आमची कंपनी जागतिक पातळीवर व्यवसाय करु लागली १९६० मध्ये पहिला रंगीत टिव्ही बाजारात आणला.

– कोनोसुके मात्सुशिता

AD
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com