अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अहवाल सादर करा – राज्यपाल
Featured

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अहवाल सादर करा – राज्यपाल

Dhananjay Shinde

सार्वमत
मुंबई – राज्यात करोना संकट असतानाही अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यावेळी सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा करून विद्यार्थी केंद्रबिंदू मानून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्यपाल कोश्यारी यांनी सामंत यांना दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी सामंत यांनी परीक्षा रद्द करुन युजीसीच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना गुण देता येईल का? याबाबत युजीसीला पत्र दिले होते. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून परीक्षा घेणेबाबत सूचना केली होती. त्यानंतर सोमवारी राज्यपाल कोश्यारी यांना फोन करून सामंत यांनी आपली भूमिका मांडली.

राज्यातील एकूण परिस्थिती पाहता करोना कधी नियंत्रणात येईल हे निश्चित नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याबाबत आपण युजीसीकडे केवळ विचारणा केली असल्याचे स्पष्टीकरण सामंत यांनी दिले. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील विद्यार्थी केंद्रबिंदू मनात सर्व कुलगुरू यांच्याशी चर्चा करावी आणि दोन दिवसात याबाबत एक अहवाल मुख्यमंत्री आणि राजभवन येथे पाठवा अशा सूचना यावेळी ना. सामंत यांना केल्या.

Deshdoot
www.deshdoot.com