राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरु करण्याचा विचार – शिक्षणमंत्री
Featured

राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरु करण्याचा विचार – शिक्षणमंत्री

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सार्वमत

मुंबई – राज्यातील शाळा येत्या 15 जूनपासून सुरु करण्याचे संकेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिले आहेत.

सध्या देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. अशात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि 15 इतर प्रमुख शहरं ही रेड झोन मध्ये आहेत. मात्र हळूहळू शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करतं आहे असं वर्षा गायकवाड यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.

दरम्यान महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्यातले 48 तास त्या सुरु ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणार्‍या शाळांना ती मुभा नसेल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Deshdoot
www.deshdoot.com