Tuesday, April 23, 2024
Homeनगर50 सोसायट्यांच्या प्रारूप याद्या जाहीर

50 सोसायट्यांच्या प्रारूप याद्या जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी) – सन 2019-2020 ते 2024-2025 या पाच वर्षांसाठी सदस्य निवडीसाठी नगर जिल्ह्यातील 50 सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या सोसायट्यांचा मतदार यादीचा कार्यक्रम प्रसिध्द झाला आहे. त्यानुसार प्रारूप याद्या जाहीर करण्यात आल्या असून या प्रारूप यादीवर हरकत घेण्यासही 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या हरकतींवर जिल्हा उपनिबंधक 9 जानेवारीला निर्णय देतील. अंतिम मतदार यादी 14 जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर कोणत्याहीक्षणी या सोसायट्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील.

संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी, वाघापूर, कौठे धांदरफळ, मंगळापूर, सुकेवाडी, घुलेवाडी, जाखुरी, कोंची. राहाता तालुक्यातील पुणतांबा, पुणतांबा विभाग बागाईतदार, माऊली, वाळकी, स्व. बाबुराव किसनराव कडू पाटील.

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील निंभेरे, चंडकापूर, अंमळनेर. नेवासा-गोमळवाडी, मुकिंदपूर, नाथकृपा (वाटापूर). शेवगाव- लखमापूरी, ढोरजळगाव, राणेगाव, अंतरवली खुर्द, ठाकूर पिंपळगाव, शेवगाव, बक्तरपूर. नगर- दशमी गव्हाण, मदडगाव, बाभळेश्‍वर(बाळेवाडी), श्रीगोंदा- शिरसगाव, मुंगूसगाव, हनुमान (माठ), पांडवगिरी (निंबवी), वडगाव शिंदोडी, हनुमान, (भावडी)गव्हाणेवाडी, गणेश (पिसोरे खांड), हंगेश्‍वर (चिंभळे),शिवशंकर (यवती) सिंध्दनाथ (सांगवी दु.), भाऊसाहेब शिपलकर (शिपलकर), अजिंक्य (काष्टी), विठ्ठल (निमगाव खलू). श्रीगोंदा-शहाजापूर, रूईछत्रपती, घाणेग़ाव-गटेवाडी, वडनेर हवेली, काळकूप

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ठरावांची संधी जुन्यांनाच..
जिल्ह्याच्या अर्थकारणासह राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणार्‍या जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी सहकारी सोसायट्यांच्या वतीने मतदान करणार्‍या प्रतिनिधींची नावे पाठविण्यासाठी 16 जानेवारीपर्यंत ठराव पाठविण्याची मुदत आहे. त्यानंतर या सोसायट्यांची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे या सोसायट्यांच्या जुन्याच मंडळींना ठरावाची संधी मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या