स्मिता अष्टेकर यांना पोलीसांनी घेतले ताब्यात; थोड्याच वेळात तृप्ती देसाई नगरमध्ये
Featured

स्मिता अष्टेकर यांना पोलीसांनी घेतले ताब्यात; थोड्याच वेळात तृप्ती देसाई नगरमध्ये

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

अहमदनगर | प्रतिनिधी

प्रसिद्ध किर्तनकार इंदूरीकर महाराज यांच्या व्हिडीओ वरून निर्माण झालेल्या वादातून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी थोड्याच वेळात पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी तृप्ती देसाई येणार आहे.

मात्र त्या पार्श्वभूमीवर नगर शहरासह अधीक्षक कार्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सेनेच्या कार्यकर्त्या स्मिता अष्टेकर यांनी देसाई यांना आव्हान दिले आहे.

देसाई यांना गाठण्यासाठी पुण्याच्या दिशेने निघालेल्या स्मिता अष्टेकर यांना भिंगार पोलिसांनी सुपा येथे ताब्यात घेतले आहे. तर, इंदूरीकर यांनी माफी मागून देखील देसाई निवेदन देण्यावर ठाम आहे. त्या थोड्याच वेळात नगरमध्ये दाखल होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com