धुळे : जिल्ह्यात आणखी सहा करोना बाधीत
Featured

धुळे : जिल्ह्यात आणखी सहा करोना बाधीत

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

आणखी सहा कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून त्यात धुळे शहरातील पाच आणि शिंदखेड्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. तर जिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्‍या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 177 रुग्ण आढळले असून सर्वाधिक 114 रुग्ण धुळे शहरातील आहेत. आज आणखी दोघांना बरे होवून घरी सोडण्यात आले.

काल रात्री आलेल्या अहवालानुसार धुळे शहरात पाच रुग्ण आढळले. त्यात 57 वर्षीय पुरुष माधवपुरा, 22 वर्षीय माधवपुरा, 28 वर्षीय महिला फिरदोसनगर, 50 वर्षीय पुरुष अभय कॉलेजजवळ, 36 वर्षीय पुरुष मोहाडी उपनगर यांचा समावेश आहे. तर शिंदखेडा येथे 24 वर्षीय पुरुष कोरोना बाधीत आढळून आला आहे.

शहरातील शिवाजी नगरामधील 54 वर्षीय व्यक्ती जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असतांना त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 21 झाली आहे.

पिता-पुत्रांनी केली मात


कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने उपचार घेत असलेल्या धुळे शहरातील पिता-पुत्रांनी कोरोनावर मात केल्याने आज त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अधिक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयातील सहकारी उपस्थित होते.

आतापर्यंत 94 जणांनी कोरोनावर मात केली असून या व्यतिरिक्त जिल्हा बाहेरील 12 जणांचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 177 रुग्ण आढळून आले असून त्यात धुळे शहरात 114 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत 82 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 64 रुग्ण उपचार घेत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com