श्रीरामपुरात गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या
Featured

श्रीरामपुरात गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

Sarvmat Digital

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील थत्ते मैदान परिसरात राहणारी वंदना दीपक सिरपुरे (वय 31) या विवाहीत महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत वंदना हिचे पती दीपक सिरपुरे हे श्रीरामपूर पंचायत समितीच्या लेखा विभागात सेवेत आहेत. मयत वंदना ही त्यांची दुसरी पत्नी आहे. त्यांना एक मुलगी आहे. पहिल्या पत्नीला एक मुलगी असून ती महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास वंदना घरात एकट्या होत्या. त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना घडली तेव्हा पती दीपक हे पंचायत समितीमध्ये काम करीत होते. तिथे फोन आल्यावर ते तात्काळ घरी गेले. पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी पाठविला. शनिवारी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी आकस्मात मॄत्यूची नोंद केली.

याबाबत कुणाचीही तक्रार नसल्याने कुणावरही गुन्हा दाखल केला नाही. असे पोलीस सांगत असले तरी दीपक व त्यांच्या घरातील महिला पुरुषांना पोलीस ठाण्यात कशाला बोलावले. तक्रार नाही तर अंत्यसंस्काराच्यावेळी स्मशानभुमित बंदोबस्त का लावला ?, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com