Tuesday, April 23, 2024
Homeनगरश्रीरामपुरात सर्वपक्षियांचा रास्तारोको

श्रीरामपुरात सर्वपक्षियांचा रास्तारोको

कोळपेवाडी अत्याचारप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी (सुरेगाव) येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला त्वरित अटक करून भर चौकात फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी सर्वपक्षियांच्यावतीने श्रीरामपुरात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. कोळपेवाडी येथील इयत्ता चौथीत शिकणार्‍या मुलीला गाडीवर नेऊन फार्महाऊसवर अत्याचार करण्यात आला. या घटनेला तीन दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरत आहेत.

- Advertisement -

त्यामुळे या आरोपीस त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भीमशक्ती सामाजिक संघटना, बहुजन वंचित आघाडी, बसपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, लहुजी सेना, विश्‍व हिंदू परिषद, आम आदमी पार्टी, मानवाधिकार संघटना, मराठा सेवा संघ, स्वारिप, कामगार संघटना या सर्वपक्षियांच्यावतीने रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन व भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट यांना देण्यात आले.

यावेळी कोपरगाव येथील घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला त्वरित अटक करावी तसेच अत्याचार करणार्‍या आरोपीला एका महिन्यात फाशी देण्यात यावी हा कायदा करून लवकरच अंमलात आणावा, अशी मागणी सर्वपक्षियांच्यावतीने करण्यात आली. आरोपीला आठ दिवसांच्या आत अटक न केल्यास जिल्ह्यामध्ये उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भीमशक्तीचे संदीप मगर यांनी दिला आहे.

यावेळी मनसेचे बाबा शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश जाधव, मानवाधिकार संघटनेचे प्रविण फरगडे, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडधे, वंचित बहुजन आघाडीचे चरण त्रिभुवन, लहुजी सेेनेचे बाळासाहेब बागुल, हानिफ पठाण, कामगार नेते नागेश सावंत, आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, विश्‍व हिंदू परिषदेचे रुपेश हरकल, मराठा सेवा संघाचे राजेंद्र भोसले, बसपाचे प्रकाश आहिरे यांची निषेधार्थ भाषणे झाली.

यावेळी बसपाचे मच्छिंद्र ढोकणे, काँग्रेस सेवा दलाचे डॉ. वैभव पंडित, रावसाहेब आल्हाट, स्वारिपचे अमोल काळे, गौतम राऊत, नगरसेवक रवि पाटील, मुन्ना पठाण, विलास ठोंबरे, सुमेश पडवळ, शुभम लोळगे, किरण कटके, दीपक शिंदे, सुनील संसारे, रामदास रेणे, विनोद शिरसाठ, संदीप अमोलिक, अरुण शरणागते, नितीन क्षीरसागर, राजू एडके, आनंद पठारे, सचिव विधाटे, अवि जगताप, संतोष मगर, कुणाल वाहुळ, मनोज सोनवणे, ऋतिक पाईक, गणेश म्हस्के, अनिल सगळगिळे, तुषार पारधे, किरण शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या