लव रंजनच्या सिनेमात श्रद्धा कपूरची एन्ट्री
Featured

लव रंजनच्या सिनेमात श्रद्धा कपूरची एन्ट्री

Sarvmat Digital

मुंबई- फिल्ममेकर लव रंजन सध्या आपल्या आगामी अनटाइटल्ड सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमात बॉलिवूडमधील कोणकोणते कलाकार दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. आता या सिनेमासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सिनेमाल रणबीर कपूरच्या अपोझिट बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूर असणार आहेत. तरण आदर्श यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. मरणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदा या सिनेमामार्फत एकत्र येणार आहे.

लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेला हा सिनेमा 26 मार्च 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. अजय, रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. (रील लाईफमध्ये रोमान्स करताना दिसणार ही जोडी) शिवाय दीपिका अजयच्या प्रेयसीची भूमिका साकारणार असल्याचे समोर येत आहे. याआधी मदे दे प्यार देफ चित्रपटात अभिनेत्री रकुल प्रितने त्याच्या प्रेयसीची भूमिकेला न्याय दिले. तर लव रंजन यांच्या आगामी चित्रपटातील अजय-दीपिका ही जोडी चाहत्यांच्या पसंतीस पडेल की नाही हे पाहाणं मजेशीर ठरणार आहे. दीपिका सध्या तिच्या छपाक चित्रपटात व्यस्त आहे. त्यानंतर ती 83 चित्रपटात अभिनेता रणवीरच्या ऑनस्क्रिन पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com