रायपूर : मयुरेश्वर इंग्लिश मिडीयम प्ले स्कूलमध्ये शिवजयंती साजरी
Featured

रायपूर : मयुरेश्वर इंग्लिश मिडीयम प्ले स्कूलमध्ये शिवजयंती साजरी

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव – 

जळगाव येथून जवळच असलेल्या रायपूर, ता. जळगाव येथील मयुरेश्वर इंग्लिश मिडियम प्ले स्कुलमध्ये आज रोजी  दि. 19 फेब्रु.छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. चुमुकल्या विध्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग पोवाडा गीत गावातील चौकात सादर करून उपस्थितांची मने जिकली. तसेच मुख्याध्यापिका सौ. भारती परदेशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

यावेळी शालेय शिक्षिका सौ. सोनाली देसले, सौ. शितल चौधरी, सौ.माधुरी पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच रायपूर परिसरात पारंपरिक पोशाखात शिवशाही रॅली काढण्यात येऊन उपस्थित ग्रामस्थ व पालकवर्ग यांना मंत्र मुग्ध केले. या प्रकारे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Deshdoot
www.deshdoot.com