शिर्डी बेमुदत बंदला 25 गावांचा पाठिंबा

शिर्डी बेमुदत बंदला  25 गावांचा पाठिंबा

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – साईबाबांच्या जन्मस्थळाच्या नामोल्लेखावरून शिर्डी ग्रामस्थांच्या भूमिकेचे समर्थन करीत शिर्डी आणि परिसरातील 25 गावांनी येत्या रविवार पासून बेमुदत शिर्डी बंदला जाहीर पाठींबा देत शिर्डीकरांच्या आंदोलनात सक्रीय सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने आता साईच्या जन्मस्थळाच्या उल्लेखाला विरोध तीव्र होत चालला आहे. राज्य सरकारने साईबाबांच्या सर्वधर्म समभाव या विचाराधारेला काळीमा फ़ासली जाणार नाही याची दक्षता घेण्याची गरज असल्याच्या भावना साईभक्तांमधून उमटू लागल्या आहेत.

दरम्यान, पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याच्या दाव्याने शिर्डीकरांनी तीव्र नापसंती व्यक्त करून साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या तत्वाला नख लावण्याचा होत असलेला प्रयत्न निंदनीय आहे.

त्याच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांनी येत्या रविवारपासून बेमुदत शिर्डी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख पाथरी येथून काढला जात नाही तोपर्यंत शिर्डीचे आंदोलन थांबणार नाही. याबाबत शिर्डी परिसरातील राहाता, अस्तगाव, पुणतांबा, डोर्‍हाळे, एकरूखे, शिंगवे, नांदुर्खी, सावळीविहीर,निघोज निमगाव, वडझरी, पिंपळस, साकुरीसह असंख्य गावातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी यांनी शिर्डी ग्रामस्थांची भेट घेऊन शिर्डीकरांच्या भुमिकेला पाठींबा देत या गावांतही बंद पाळण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, साईनिर्माणचे अध्यक्ष विजय कोते,उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन,नगरसेवक शिवाजी गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, बाबासाहेब कोते, नगरसेवक सुजीत गोंदकर, विजय जगताप, रवींंद्र गोंदकर, दीपक वारूळे, डॉ.धनंजय धनवटे, भगीरथ होन, जमादार इनामदार, सुधाकर शिंदे,गफ्फारभाई, गणीभाई,शब्बीर शेख, नसीर शेख, नज़ीर दारूवाले, बाबासाहेब चौधरी, मनसेचे दत्ता कोते,शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन कोते यांच्यासह शिर्डी आणी गणेश परिसरातील असंख्य ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखावरून शिर्डी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत शिर्डी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज देशाच्या विविध भागातून आलेल्या साईभक्तांनी साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखामुळे आमच्या भावनांचा अनादर केला जात असल्याने साईभक्त ही या आंदोलनात सक्रीय होणार असल्याची भावना व्यक्त केल्या आहे .

साईबाबांच्या जन्मस्थळ अथवा त्यांच्या विचारांवर कोणी कितीही दावे प्रतिदावे केले तरी साईभक्तांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. साईबाबांची शिर्डीत भाविकांसाठी श्रध्देचे ठिकाण आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परिपक्व आहेत. त्यांनी जन्मस्थळाचा उल्लेख का केला याबद्दल मी काही बोलणार नाही. मात्र ही चुकीची बाब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यास ते जन्मस्थळाच्या नामोल्लेखाच्या वादावर नक्कीच तोड़ेगा काढतील. साईबाबा हे साईभक्तांच्या श्रध्देचे ठिकाण असल्याने कोणी कितीही राजकीय पोळी भाजण्याता प्रयत्न केला तरी त्यांना त्यात यश येणार नाही .
दिगंबर कामत, माजी मुख्यमंत्री, गोवा

साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखाने शिर्डी आणी परिसरातील नागरीकांच्या भावनांचा मोठा उद्रेक झाल्यावर आता शिर्डीत लोकप्रतिनिधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने आज (शनिवारी) शिर्डीत ग्रामस्थांच्या बैठ्ठकीचे आयोजन केले आहे . या बैठ्ठकीत विखे पाटील काय भुमिका घेतात याकडे शिर्डी ग्रामस्थ आणी साईभक्तांचे लक्ष लागले आहे . विखे पाटील यांनी यापुरेवी नेहमीच शिर्डीकर आणी साईभक्तांच्याच बाजुने उभे राहीले असल्याने यंदाही आंदोलनात ते सक्रीय झाले तर शिर्डीकरांच्या आंदोलनाला मोठे बळ मिळेल त्यामुळे सरकारला ठोस भुमीका घ्यावी लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com