शिर्डी विमानतळ उद्यापासून सुरू

jalgaon-digital
2 Min Read

रांजणगाव देशमुख (वार्ताहर)- साईभक्तांच्या सोयीसाठी काकडी येथे असलेल्या विमानतळावरील उड्डाणे दृष्यमानतेमुळे 14 नोव्हेंबरपासून बंद होती. बुधवार दिनांक 11 डिसेंबरपासून ही उड्डाणे पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र पहिल्या टप्प्यात सर्व उड्डाणे सुरू होणार नाहीत. स्पाईसजेट पहिल्या दिवशी नऊपैकी सहा उड्डाणे सुरू करणार आहेत.त्यापाठोपाठ इतर कंपन्यांची विमानसेवाही सुरू होणार असल्याचे विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी सार्वमतशी बोलताना सांगितले.

दिल्ली, चेन्नई, बेंगलरू, हैदराबाद येथील विमानसेवा सुरू होत आहे. दृष्यमानतेसाठी आवश्यक यंत्रणा याठिकाणी कमी पडत होती. रात्रीची विमानसेवा सुरू झाल्यावर येथे दृष्यमानतेची समस्या मिटणार आहे. दृष्यमानता कमी असताना रात्रीच्या विमानसेवासाठी असलेली यंत्रसामुग्री तात्पुरत्या स्वरुपात शिर्डी विमानतळावर वेगाने कार्यान्वित करण्यात आली आहे. विमानतळ लवकर सुरू व्हावे यासाठी हे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू होते..

तात्पुरत्या स्वरुपात बसविलेल्या यंत्रणेची पाहणी दिल्लीच्या विमान नागरी उड्डाण संचालनालयाच्या पथकांनी नुकतीच केली. त्यांचा नविन केलेल्या उपाययोजनेचा अहवाल सकारात्मक आल्याने काकडीतील विमानसेवा पुन्हा पूर्ववत सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डी.व्ही.ओ.आर.चे कामही पूर्ण झाले आहे. काकडीतील सेवा ठप्प असल्याने मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली होती. दोन वर्षे सलग सुरू असलेली विमानसेवा अचानक बंद पडल्याने विमानप्रवासांची मोठी गैरसोय झाली होती. सलग 27 दिवस हे विमानतळ बंद राहिले. 28 व्या दिवशी विमानतळ सुरू होणार आहे. दिल्लीच्या पथकाच्या अहवालानंतर विमानतळ विकास प्राधिकरणाने विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात विमान कंपन्यांना कळविले असल्याचे शास्त्री यांनी सांगितले.

दिल्लीच्या डीजीसीएच्या पथकाने नविन काम केले. त्यांची पाहणी केली आहे. विमानसेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.त्यामुळे विमानसेवा सुरू होणार आहे.ही सेवा आता बुधवारपासुन सुरू होईल.
-दीपक शास्त्री, संचालक, शिर्डी विमानतळ

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *