पंतप्रधानांना 21 हजार पत्र पाठविणार
Featured

पंतप्रधानांना 21 हजार पत्र पाठविणार

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जातीनिहाय जनगणनेची मागणी : समता परिषदेचे आंदोलन

ओबिसी जातिनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी समता परिषदेतर्फे पंतप्रधानांना 21 हजार पत्रे पाठविण्यात येणार असुन या आंदोलनाचा शुभारंभ शहाद्यातुन करण्यात आला.आगामी काळात देशात होणारी जनगणना ओबिसी जातीनिहाय करावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी समता परिषदेतर्फे नाशिक विभागातुन पंतप्रधान मोदी यांना एक लाख 21 हजार पत्र पाठविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातुन अशी 21 हजार पत्रे पाठविण्यात येणार आहेत.या आंदोलनाचा शुभारंभ रविवारी शहाद्यात नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, तालुकाध्यक्ष जगदीश माळी, पं स सदस्य राजेंद्र बाविस्कर, ईश्वर पाटील, अशोक माळी, पंडित जाधव, घनःश्याम निझरे, शांतीलाल साळी, दिपक गोसावी, सुरेंद्र कुंवर, मनोज वारूळे, यादव माळी, जगदीश चौधरी, अण्णा महाजन, डॉ. अशोक जगताप आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com