Featured

सार्वमत शॉपिंग एक्स्पो : दुसर्‍या दिवशी ग्राहकांच्या गर्दीचा उच्चांक

Dhananjay Shinde

सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2020 च्या आयोजनाबद्दल ग्राहक व विक्रेत्यांकडून दै. सार्वमतचे कौतुक !

ग्रुप डान्स स्पर्धेचे दीपप्रज्वलन करताना साई मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, साई आदर्श पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. संगिता कपाळे, समवेत परीक्षक सौ. उषा गाडेकर, याज्ञी कांबळे, अर्चना आहेर.
ग्रुप डान्स स्पर्धेचे दीपप्रज्वलन करताना साई मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, साई आदर्श पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. संगिता कपाळे, समवेत परीक्षक सौ. उषा गाडेकर, याज्ञी कांबळे, अर्चना आहेर.

‘ग्रुप डान्स’ स्पर्धा ठरली आकर्षण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – दैनिक सार्वमत आयोजित ‘सार्वतम शॉपिंग एक्स्पो 2020’ निमित्त आयोजित मनोरंजनाच्या मेजवानीत काल (शुक्रवार) झालेली ‘ग्रुप डान्स’ स्पर्धा कालच्या दिवसाची आकर्षण ठरली.
गुरुवारी पार पडलेल्या ‘सोलो डान्स’ स्पर्धेनंतर काल पार पडलेल्या ग्रुप डान्स स्पर्धेत तब्बल 11 संघांनी सहभाग नोंदविला. त्यात आर. डी. ए. ग्रुप, डी.जे. बॉईज ग्रुप, रॉयल ग्रुप, श्रीरामपूर, स्नेहमाला डान्स अकॅडमी, न. पा. शाळा क्रमांक 6, कै. अनिल दिगंबर मुळे प्राथमिक शाळा, अनुर्षी चव्हाण व हिंदवी रोडे, गौरव थोरात व गौतम पवार, स्टार ग्रुप, मयूर आणि गरीब नवाज, रेणुका-प्रेरणा ग्रुप आदींचा सहभाग होता.
स्पर्धेचा शुभारंभ साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, साई आदर्श पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. संगीता कपाळे व स्पर्धेच्या परीक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
क्रांतीकारी भगतसिंग, सेनापती तानाजी मालुसरे, मुलगी वाचवा, याशिवाय वेगवेगळ्या देशभक्तीपर कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. त्यात सेनापती तानाजी यांच्या पराक्रमाच्या सादरीकरणाने उपस्थितांकडून टाळ्या मिळविल्या. क्रांतीकारक भगतसिंग सह देशभक्तीपर इतर सादरीकरणानीही प्रेक्षकांचे लक्ष वेधले. कै.अनिल दिगंबर मुळे प्राथमिक शाळा तसेच नगर पालिका शाळा क्र. 6 च्या बालकलाकारांनी सादर केलेल्या नृत्यालाही उपस्थितांनी दाद दिली.
त्यापूर्वी गुरुवारी पार पडलेल्या सोलो डान्स स्पर्धेत दैनिक सार्वमत आयोजित सोलो डान्स स्पर्धेमध्ये शोएब बागवान, गणेश मगरे, सौरभ संकपाळ, दर्शन खाकुर्डे, अर्जुन निरमखे, भक्ती पंकज गंगवाल, वृषभ गंगवाल, गणेश शिरसाठ, पलक पांडे, जीविका पांडे, अक्षदा वाकळे, गरीब नवाज, आर्षान सलिम पटेल, रौनक शिंदे, समृध्दी दळवी, मृन्मयी लोखंडे, खुशी दरक, तनिष्का विनोद वाघमारे, वृषिकेश गांगुर्डे, अथर्व जेजुरकर, श्रेयस जोगी, रितिषा किशोर लबडे, ऋषी नारायण लबडे, हरजसकौर चुग, अनंत लोळगे, नेत्रा धाके, श्रावणी धमाले, सोहम साळुंके, सहर्षा साळवे आदींनी सहभाग नोंदविला.
या दोन्ही स्पर्धेचे परीक्षक म्हणून विजय ढोले, सौ. उषा गाडेकर, अर्चना आहेर, याज्ञी कांबळे यांनी काम पाहिले. तर तर प्रा. आदिनाथ जोशी यांनी अतिशय उत्कृष्ट शैलीत दोन्ही स्पर्धाचे सूत्रसंचालन केले.

सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2020 ला श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सौ. दिपाली काळे व डॉ. प्रमोद काळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांना स्टॉलवर पुस्तक खरेदीचा मोह आवरता आला नाही.
सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2020 ला श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सौ. दिपाली काळे व डॉ. प्रमोद काळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांना स्टॉलवर पुस्तक खरेदीचा मोह आवरता आला नाही.

आज बक्षिस वितरण
सोलो डान्स व ग्रुप डान्स स्पर्धेचे निकाल जाहीर करुन आज दि. 29 फेब्रुवारी सायंकाळी 7 वाजता थत्ते ग्राऊंड येथे मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण होणार आहे.

भाग्यवान ग्राहक
काल दि. 28 फेब्रुवारी रोजी दुसर्‍या दिवशी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये खालील ग्राहक भाग्यवान ठरले.
राजवर्धन गिरमे, भूमी सोनुने, वरद किशोर खटोड, सौ. कमल ज्ञानदेव पवार, सौ. अंजली भगवान तुपे, उज्वला रमेश बावके, दिव्या पटेल, सुरेश नागपाल, सिमरन अश्पाक पिंजारी, प्रदिप विश्‍वनाथ वैद्य.
या महोत्सवात भेट देणार्‍या ग्राहकांमधून दररोज लकी ड्रॉ पद्धतीने 10 भाग्यवान ग्राहकांची निवड केली जात आहे. या ग्राहकांना दै. सार्वमतच्यावतीने आकर्षक भेट वस्तू दिली जाणार आहे. विजेत्या ग्राहकांनी आपली बक्षिसे आज शनिवार दि. 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता थत्ते मैदान येथून ओळखपत्र दाखून घेवून जावी.

रगडा पॅटीसवर ताव
चोखंदळ ग्राहक असलेले श्रीरापूरकर चायनिज, रगडा, पॅटीश बरोबर पाणीपुरी, भेळीचा स्वाद चाखण्यासाठी मोठी गर्दी कतर आहेत.. याच ठिकाणी चटपटीत बरोबरच चायनीज पदार्थही मिळत असल्याने तरुण- तरुणींबरोबरच महिला वर्ग व अबालवृध्दांचीही या ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसत आहे..

चटपटीत कटोरी चाट
15 साहित्याचा वापर करुन बनविलेली चटपटीत कटोरी चाट खाण्यासाठी श्रीरामपूरकरांनी मोठी गर्दी केली. येथे स्वादिष्ट पदार्थ मिळत असल्याने ग्राहकांचीही मागणी वाढती आहे. विशेष म्हणजे या स्टॉलवर वृध्दांसह बाल चिमुकल्यांची मोठी गर्दी पडली होती. आणखी दोन दिवस श्रीरामपूरकरांना या कटोरी चाटची चव चाखता येणार आहे.

खान्देशी पावभाजीवर झडप
खान्देश जळगावची लोकप्रिय असलेल्या पावभाजीवर नागरिकांनी झडप घालून खाण्याचा मनमुराद आनंद लुटला. तर याच्या जोडीला दाबेली, भेळ, पाणीपुरीचीही चव चाखायला मिळाली. श्रीरामपूरकरांनी खान्देशी पदार्थाला दिलेला प्रतिसाद पाहून इतर स्टॉलधारकांनी खान्देशी पावभाजीची चव चाखली.

सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2020 निमित्त आयोजित ग्रुप डान्स स्पर्धेत सेनापती तानाजी मालूसरे. यांचा पराक्रम सादर करणारा संघ
सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2020 निमित्त आयोजित ग्रुप डान्स स्पर्धेत सेनापती तानाजी मालूसरे. यांचा पराक्रम सादर करणारा संघ

ग्राहकांना अनोखी संधी
दैनिक सार्वमतने शॉपिंग एक्स्पोच्या माध्यमातून श्रीरामपूरकरांना एकाच छताखाली सर्व काही खरेदी करण्याची संधी मिळाली. या उपक्रमास लाख लाख शुभेच्छा!
डॉ. नानासाहेब भोगे, ग्राहक.

स्तूत्य उपक्रम
या महोत्सवातून नागरिकांनी आमच्याकडून माहिती जाणून घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे ग्रामीण भागातूनही प्रतिसाद मिळाला.
संकेत गाडे, हुंडाई कार

महोत्सवातून वेगळेपण.
सार्वमत आयोजित केलेल्या या उपक्रमास नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त पाहता दरवर्षी असा महोत्सव आयोजित करणे गरजेचे आहे. यातून वेगळेपण अनुभवायास मिळाले. सुमित वाबळे

गुणवत्तेचा पर्याय
या शॉपिंग एक्स्पो महोत्सवातून योगिराज फर्निचरला एक वेगळी ओळख मिळाली. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण वस्तू पहायला मिळाल्याने ग्राहकांचीही मोठी गर्दी होत आहे. – योगेश कोहकडे, योगिराज फर्निचर

उत्तम प्रकारे नियोजन
सर्व कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत उत्तम प्रकारे केले आहे. अशा कार्यक्रमांची श्रीरामपूर सारख्या ठिकाणी गरज आहे. यापुढेही असे कार्यक्रम व्हावे.
किरण काळे, ग्राहक

शिस्तबध्द कार्यक्रम
ग्राहकांनी विविध योजनांची माहिती जाणून घेत बँकेला भेटी देणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे गर्दी होऊनही शांततेत नागरिक येत असल्याने निराळेपण दिसून आले. पराग फोपळे, महर्षी पतसंस्था

मुलांच्या कलागुणांना वाव
या एक्स्पो मध्ये सर्व प्रकारच्या वस्तू एकाच छताखाली आणून ग्राहकांची उत्तम प्रकारे सोय करण्याबरोबरच मुलांच्या कलागुणांना देखील वाव दिला आहे.
सौ. निरज रविंद्र गुप्ता, ग्राहक

नऊ दिवसांचा कार्यक्रम अपेक्षित
कार्यक्रम चार दिवसांचा असल्याने विक्रीसाठी वेळ अपुरा पडतो. त्यामुळे कमीतकमी नऊ दिवसांचा कार्यक्रम होणे अपेक्षित आहे.
दिपक शर्मा, बसंत ज्युसर

उत्तम मनोरंजनाची मेजवाणी
खाण्या-पिण्याच्या स्टॉलबरोबरच मनोरंजनासाठी उत्तम असे कार्यक्रम ठेवले. यामुळे श्रीरामपुरकरांना एक नवीन अनुभव मिळाला.
भारत गायधने, ग्राहक

ग्राहकांचा प्रतिसाद
ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पुढील वर्षी देखील अशा कार्यक्रमांचे आयोजन नक्की करावे. ग्राहकांना देखील उत्तम सुविधा मिळाली. श्रीराम चौधरी, टी.व्ही.एस.भन्साळी

ग्राहकांची उत्तम सोय
श्रीरामपूर शॉपिंग एक्स्पोमध्ये सर्व वस्तूंचे स्टॉल लावले गेल्याने ग्राहकांना एकाच ठिकाणी उत्तम प्रकारे खरेदीचा आनंद घेता येईल.
सौ. वैशाली मिलिंद गिरमे, ग्राहक

स्तूत्य उपक्रम
दै. सार्वमतने आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय स्त्युत्य आहे. संयोजकांनी नियोजन उत्तम प्रकारे केले आहे. मनोरंजनाच्या कार्यक्रमामुळे ग्राहकांची संख्या वाढली. सुशांत दिवे, टाटा मोटर्स, कार

Deshdoot
www.deshdoot.com