कोरोना : ग्रामसेवक देणार दिवसाचा पगार
Featured

कोरोना : ग्रामसेवक देणार दिवसाचा पगार

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सार्वमत

राज्य ग्रामसेवक युनियनचे ग्रामविकास मंत्र्यांना पत्र
अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून राज्य शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे. त्यासाठी राज्यातील ग्रामसेवकांचे एक दिवसाचे वेतन कपात करावे, अशी विनंती राज्य ग्रामसेवक संघटनेने शासनाला केली आहे.

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी शासन आपापल्या पातळीवर विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. त्या उपाययोजनांचा विचार करून शासनाला मदतीसाठी राज्यातील सुमारे बावीस हजार ग्रामसेवकांनी सुमारे तीन कोटी रुपयांचे एक दिवसाचे वेतन राज्याच्या मुख्यमंत्री निधीसाठी देऊ केले आहेत.

यासाठी राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री व ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना निवेदन पाठवून कपात करण्याची विनंती केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com