Thursday, April 25, 2024
Homeनगरनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात छात्रभारतीचे आंदोलन

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात छात्रभारतीचे आंदोलन

संगमनेर (प्रतिनिधी) – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात छात्रभारती संघटनेच्या वतीने काल प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भारतातील गेल्या काही वर्षातील घटना पाहता संविधानिक नागरिक म्हणून आम्ही चिंतित आहोत. देशावर निरंकुश सत्ता आलेल्या सरकारकडून धर्मावर आधारीत, वंशावर आधारीत भेद करणार्‍या घटनांची संख्या संवेदनशील नागररिक म्हणून चिंतेत टाकणारी आहे.

अस्थायी असणारे 370 कलम काश्मिरमधील जनतेला विश्‍वासात घेऊन क्रमाक्रमाने रद्दबातल ठरविण्यासाठी प्रक्रिया यापूर्वीच्या सरकारकडूनही सुरू होेती. केवळ काश्मिरी भूमीवर प्रेम असणार्‍या व काश्मीरस्थित मुस्लीम जनतेचा पराकोटीचा द्वेष करणार्‍या सध्याच्या सरकारने काश्मीरचे अस्तित्वच पुसून टाकण्यासाठी काश्मीरला केंद्रशासित प्रदेश करून आम्हीच खरे राष्ट्रवादी आहोत, लष्करी बळाच्या उन्मादी राष्ट्रवादातून गेले काही महिने काश्मिरी जनतेचा आवाज सर्व मार्गांनी बंद केला आहे.

- Advertisement -

हे अन्यायकारक आहे. तसेच घटनेच्या विरोधात आहे. याची जाणीव छात्रभारती संघटना करून देत आहे. सीएबी आणि एनआरसी या येऊ घातलेल्या कायद्यानुसार धर्माच्या आधारीत भेद करुन विशिष्ट धर्मसमुदायाच्या भारतीय नागरिकत्वाच्या व्याख्येनुसार वगळण्याचा हा अत्यंत कुटील व मनुवादी प्रवृत्तीचा घातकी प्रयत्न असल्याचे छात्रभारती संघटनेचे मत आहे. त्यामुळे भारतीय संविधानाला आदर्शदूत मानून जीवन व्यतित करणारे सर्व भारतीय लोक सीएबी व एनआरसी या कायद्याचा धिक्कार करत आहेत. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला समस्त आणि एक आहे या भूमिकेतून आम्ही प्रथम भारतीय आहोत व अंतिम सुध्दा भारतीय आहोत.

याच न्यायाने सीएबी व एनआरसी हा कायदा रद्द करण्यात यावा, जामिया व एएमयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांची देशभरातील होणार्‍या सर्व विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करावी, देशभरातील स्त्री सुरक्षिततेचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत असतांना स्त्रियांना सुरक्षा प्रदान करण्याच्या योग्यतेतून सर्वसमावेशक धोरण आखावे, सीएबी व एनआरसी कायदा रद्द करण्याचा आपण हस्तक्षेप करुन मानवी समूहाचे गोठ्यात रुपांतरीत करणारा कायदा रद्द करावा, अशी मागणी छात्रभारतीच्यावतीने करण्यात आली आहे.

या मागण्यांसाठी छात्रभारती संघटनेने अँंग्लो उर्दू कॉलेज ते प्रांत कार्यालय असा मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांना जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी नायब तहसीलदार मेंगाळ यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. याप्रसंगी छात्रभारती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिकेत घुले, गणेश जोंधळे, तुषार पानसरे, हर्षल कोकणें, तृप्ती जोर्वेकर, ऋतिक वर्पे, प्रसाद जाधव, प्रशांत काकड, शितल रोकडे, ओंकार नवली, सचिन रेवकडे, सागर वर्पे, राहूल जर्‍हाड, आकाश पानसरे, सुप्रिया पवार, सागर गुंजाळ आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या