साक्रीतून आणखी 32 संशयितांचे घेतले नमूने
Featured

साक्रीतून आणखी 32 संशयितांचे घेतले नमूने

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

आज 17 रिपोर्ट निगेटीव्ह, 16 अद्याप प्रलंबित

कोरोनामुळे मृत्यू झालेला व्यक्ती साक्री शहरातील रहिवाशी असल्याने साक्री सील करण्यात आले आहे. आज पुन्हा 32 संशयितांचे नमूने घेण्यात आले आहेत. तर कालपर्यंत प्राप्त नमुन्यांपैकी आज 17 रिपोर्ट निगेटीव्ह आले असून 16 रिपोर्ट रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील अशी माहिती वैद्यकीय यंत्रणेने दिली.

साक्रीतील 53 वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा व प्रशासनाने साक्रीवर लक्ष केंद्रीत केले आहे. पुन्हा 14 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढविण्यासह साक्री सील करण्यात आले आहे. कालपर्यंत 24 आणि नव्याने 8 असे 33 नमुने घेण्यात आले होते.

यापैकी 17 नमुन्यांचे रिपोर्ट आज निगेटीव्ह प्राप्त झाले आहे. तर 16 रिपोर्ट अद्याप पेंडींग आहेत. या 33 नमुन्यांमध्ये 14 नमुने साक्री शहरातील आहे. आज पुन्हा नव्याने 32 नमुने घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. राजकुमार सुर्यवंशी यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com