छायाचित्रकाराशी लपंडाव खेळतोय सैफचा मुलगा
Featured

छायाचित्रकाराशी लपंडाव खेळतोय सैफचा मुलगा

Sarvmat Digital

मुंबई- अभिनेता सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान हिने केदारनाथ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. साराने तिच्या पदार्पणातच अनेकांची मनं जिंकली. ज्यामागोमाग आता माध्यमं, छायाचित्रकार आणि याच कलाविश्वाच्या नजरा सैफचा मुलगा इब्राहिम अली खान याच्यावर खिळल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून त्याचा एकंदर वावर पाहता इब्राहिमचा अंदाज आतापासूनच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मुख्य म्हणजे तो जेथे जाईल तेथेसुद्धा अनेकांची गर्दी पाहायला मिळते. पण, आपल्यामागे असणार्‍या या गर्दीपासून आणि छायाचित्रकारांपासून इब्राहिम मात्र पळ काढताना दिसत आहे.

सोशल मीडियावर अशाच एका प्रसंगाचं कथन करणारा व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये क्रिकेटच्या सरावानंतर इब्राहिम कारमध्ये बसण्यासाठी म्हणून त्याच्या कारपाशी येतो. तेव्हा छायाचित्रकार त्याची एक झलक टीपण्यासाठी म्हणून त्याचा पाठलाग सोडतच नाही. त्यामुळे त्याच्यापासून लपण्यासाठी म्हणून अक्षरश: तो कारच्या आड लपत लहान मुलांप्रमाणे लपंडावाचटा खेळ खेळतानाच दिसत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com