अकोले : रुंभोडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
Featured

अकोले : रुंभोडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

Sarvmat Digital

इंदुरी (वार्ताहर)- अकोले तालुक्यातील रूंभोडी येथे एका बेकायदेशीरपणे चालणार्‍या जुगार अड्ड्यावर अकोले पोलिसांनी छापा मारला. यावेळी तिरट नावाचा जुगार खेळताना पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. रुंभोडी येथील प्रवरा नदी किनारी बिरोबा मंदिर परिसरात बेकायदेशीरपणे जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शिपनकर, पोलीस नाईक हासे यांनी छापा टाकला असता विनापरवाना तिरट नावाचा जुगार खेळत असताना रावसाहेब मधे, अनिल पुंडे, शाहरुख शेख, रिजवान शेख, सोमनाथ आगिवीले सर्व राहणार रुंभोडी यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 22/अ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल शिपनकर, पोलीस नाईक हासे करीत आहे .पोलिसांच्या या कारवाईचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून गावात गस्त वाढविण्यासाठी विनंती केली आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com