दरोडेखोरांची टोळी जेरबंद

दरोडेखोरांची टोळी जेरबंद

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील भिस्तबाग महलाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेली राहुरी, श्रीरामपूरातील दरोडेखोरांची टोळी जेरबंद करण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले. ही कारवाई काल बुधवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या टोळीकडून चारचाकी वाहन व अन्य हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत.

शहरात कुठेतरी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी कॉटेज कॉर्नर ते तपोवर रोड जाणार्‍या रोडवरील भिस्तबाग महलाजवळ राजेश बबन देशमुख (वय 24, रा. दत्तनगर, स्टेशन रोड राहुरी), कंबर रहीम मिर्झा (वय 31, रा. मदर तेरेसा सर्कल, कॉलेज रोड, वॉर्ड नं. 1, श्रीरामपूर), जफर मुक्तार शेख (वय 29, वॉर्ड नं. 2, सुभेदार वस्ती, श्रीरामपूर), जाकीर उर्फ जग्या युनुस खान (वय 25, इराणी गल्ली, श्रीरामपूर), अनिल रावसाहेब चव्हाण (वय 20, दत्तनगर, स्टेशनरोड, राहुरी) यांच्याकडे सत्तुर, लोखंडी चाकू, लाकडी दांडके, मोबाईल, एक कार बाळगून दरोड्याच्या तयारीत असता मिळून आले. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कामगिरी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com