पुणे, मुंबई येथून विळदमध्ये आलेल्या 50 जणांची नोंद
Featured

पुणे, मुंबई येथून विळदमध्ये आलेल्या 50 जणांची नोंद

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) – अन्य जिल्ह्यातुन विशेषतः पुणे, मुंबई येथून विळदमध्ये आलेल्या 50 जणांची माहिती आज नगर तालुक्यातील विळद ग्रामपंचायतीने संकलित करुन जिल्हा आरोग्य विभागाला दिली आहे. उद्याही अन्य जिल्ह्यातुन गावात आलेल्यांची नोंद करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूच्या निर्मुलनासाठी सुरु असलेल्या लढाईत खबरदारी म्हणून अन्य जिल्ह्यांतुन गावात आलेल्यांची नोंद ठेवण्याचे निर्देश तहसिलदारांनी दिले आहेत. त्यासाठी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याठिकाणी नोंद करण्यासही सांगितले आहे.

त्यानुसार पुणे, मुंबई व अन्य जिल्ह्यांतुन येणार्‍या लोकांची नोंद ठेवली जात आहे. दरम्यान शहर व तालुक्यातुन पुणे -मुंबई सह शहरी भागात नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित्ताने गेलेले लोक मोठ्या प्रमाणात गावाकडे येत असून त्याची नोंद ठेवली जात आहे. ही माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असून जागृक नागरिक या नात्याने संबंधितांनी ही माहिती द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com