Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedजळगाव : मोठे वाघोदा येथे ५ महिन्याच्या चिमुरडीला करोनाची लागण

जळगाव : मोठे वाघोदा येथे ५ महिन्याच्या चिमुरडीला करोनाची लागण

रावेर तालुक्यात कोरोना बधितांचा आलेख वाढताच ;  सोशल डिस्टन्सिंगचा बट्ट्याबोळ

रविवारी रावेरसह परिसरात ११ जण पॉझिटिव्ह सापडले यात अवघ्या पाच महिन्याच्या बलिकेचा समावेश आहे. तर २ कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने रावेरात आणखी चिंता वाढली आहे.
दरोरोज रुग्ण वाढत असल्याने प्रतिबंधीत क्षेत्र देखील वाढत असताना,घराबाहेर पडणाऱ्या लोकांच्या झुंडीमुळे धोका वाढत आहे,मात्र तरीही सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास लोकांकडून सहकार्य होत नसल्याने प्रशासनाने देखील हात टेकवून दिल्याचे दृश्य नजरेत पडत आहे.
रविवारी पॉझिटिव्ह आलेल्या रिपोर्टपैकी ११ जण रावेर व परिसरातील आहे.यात नाला भागातील २६ व २४ वर्षीय पुरुष,उटखेडा रोडवर ५० वर्षीय पुरुष,चिनावल येथे एक जण,वाघोदा बुद्रुक येथे १४ वर्षीय बालिका,५ वर्षीय बालक २७ व ५२ वर्षीय पुरुष आणि पाच महिन्याची चिमुरडी बाधित झाली असून एकाच मृत्यू झाला आहे.रमजीपूर येथील करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाची भीती संपूर्ण तालुक्यात पसरली आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या