रणवीर सिंगचा असा असेल ‘जयेशभाई जोरदार’
Featured

रणवीर सिंगचा असा असेल ‘जयेशभाई जोरदार’

Sarvmat Digital

मुंबई: पद्मावत या चित्रपटात खलनायक आणि गली बॉय चित्रपटात रॅपरची भूमिका साकारल्यावर अभिनेता रणवीर सिंग कोणती भूमिका साकारणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. भारतीय क्रिकेट संघानं 1983 मध्ये जिंकलेला विश्वकप या घटनेवर आधारित 83 या चित्रपटात रणवीर ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारतोय. या चित्रपटाची चाहते वाट पाहात असतानाच रणवीरचा जयेशभाई जोरदार या चित्रपटाचा लूक समोर आला आहे.

रामलीला या चित्रपटानंतर रणवीर पुन्हा एकदा गुजराती व्यक्तीची भूमिका साकारतोय. दिव्यांग ठक्करच्या या चित्रपटातला त्याचा लूक हट के असल्यानं सोशल मीडियात तो व्हायरल झाला. आपला समाज हा स्त्रियांबाबत सतत कसा जजमेंटल आहे, हे या चित्रपटात दाखवलं जाणार आहे. रणवीर यात सामान्य व्यक्तीची भूमिका साकारतोय, जो एका मोठ्या अडचणीत सापडतो. रामलीला या चित्रपटात रणवीरनं गुजराती युवकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो पुन्हा एकदा गुजराती म्हणून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

पोस्टरमध्ये त्याच्या या लूकसह चेहर्‍यावर घुंघट घेतलेल्या स्त्रिया दिसत आहेत. यात रणवीरनं पुन्हा एकदा मिशी ठेवली आहे. वेगळी हेअरस्टाइल आणि कपड्यांमुळेही तो लक्ष वेधून घेत आहे. एका हातात गोल्डन घड्याळ आणि दुसर्‍या हातात धागा बांधल्यानं त्याचा हा लूक जमून आला आहे. या भूमिकेचे आणि चित्रपटाचे इतर तपशील अद्याप गुलदस्त्यात आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com