Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पुढील 5 दिवसांत पावसाची शक्यता

राज्यात पुढील 5 दिवसांत पावसाची शक्यता

पुणे (प्रतिनिधी) – पुढील पाच दिवसांत कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
14 तारखेला गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊसाची शक्यता आहे. तर विदर्भ, कोकण, गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे तर पंधरा तारखेला मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
16 आणि 17 तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दोन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.तर कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

मार्केट यार्डात आंबा पडून
कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुणे मार्केट यार्ड बंद असल्याने आंब्याला मोठा फटाका बसला आहे.
पुणे मार्केटला विक्री अभावी आंब्याच्या पेट्या पडून आहेत. ग्राहक नसल्यानं शेतकरी आणि व्यापार्‍यांनाही मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आंब्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झालीय. एका पेटीमागं 3800 ते 4200 रुपये दर पडले आहेत. यंदा बाराशे ते अठराशे रुपये आंब्याच्या एका पेटीचा दर आहे. गेल्या वर्षी पाच ते सहा हजार दराने आंब्याची विक्री झाली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 80 टक्के आंब्याचं नुकसान झालं आहे. मार्केट यार्डला आंबा सडण्याची व्यापार्‍यांना भीती सतावत आहे. गेल्या शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी मार्केट यार्ड बंद आहे. मार्केट पुन्हा कधी सुरू होईल याबाबत अजून शाश्वती नाही. त्यामुळे आंबा उत्पादकांना यंदा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या