Featured

नंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार –

नंदुरबार शहरातील युवक नुकताच अबुधाबी येथून परतला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर दक्षता म्हणून आरोग्य विभागाने त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. असे असतांनाही हा युवक आज सकाळी रेल्वे स्थानक परिसरात फिरतांना सापडला.

नंदुरबार येथील एक युवक अबुधाबी येथून नुकताच परतला होता. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरोग्य विभागाने दक्षता म्हणून त्याची तपासणी केली व त्याला 14 दिवस होम क्वारंटाईन केले होते.

आज दि.21 मार्च रोजी सकाळी 8.30 ते 9 वाजेदरम्यान हा युवक नंदुरबार रेल्वे स्थानक परिसरात फिरतांना आढळला. त्याच्या हातावर असलेला शिक्का बघून नागरीक घाबरले होते. आरोग्य विभागाला कळवल्यावर जिल्हा रूग्णालयाच्या 108 रूग्णवाहिकेत त्याला त्याची घरी सोडण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com