Friday, April 26, 2024
Homeनगरथोरात, डॉ. विखे पाटील कारखान्यांना पुरस्कार

थोरात, डॉ. विखे पाटील कारखान्यांना पुरस्कार

उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनात ‘अंबालिका’ प्रथम

पुणे (प्रतिनिधी)- वसंतदादा शुगर इन्स्टिट़्यूटच्यावतीने देण्यात येणारा 2018-19 साठीचा कै. वसंतदादा पाटील सर्वोकृष्ट साखर कारखाना पुरस्कार यंदा पुणे जिह्यातील दौंड तालुक्यातील दौंड शुगर प्रा. लि. या कारखान्याला जाहीर झाला आहे. 2 लाख 51 हजार आणि मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरम्यान, विभागवार तांत्रिक कार्यक्षमता मध्य विभाग प्रथम पुरस्कार संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखान्याला तर तृतीय पुरस्कार राहात्यातील प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सह. साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. तर उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा मध्य विभागातील पुरस्कार कर्जतच्या अंबालिका शुगर प्रा. लि. ला जाहीर झाला आहे.

- Advertisement -

व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. याशिवाय कै. डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन पुरस्कारासाठी आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रयनगर, पारगाव, आवसरी बु. येथील भीमाशंकर कारखान्याला तर विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्काराकरिता पलूसमधील क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड कारखाना व कर्मयोगी शंकरराव पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कारासाठी जालन्याच्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याची निवड करण्यात आली आहे.

शिवाजीराव देशमुख म्हणाले, कै. आबासाहेब उर्फ किसन महादेव वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार कोल्हापुरातील जवाहर कारखान्याला देण्यात येणार आहे. मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व एक लाख रुपये रोख असे या सर्व पुरस्कारांचे स्वरूप आहे. रावसाहेब पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार पुण्यातील बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर कारखाना, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार दक्षिण विभागात कोल्हापुरातील शरद कारखाना, मध्य विभागात अहमदनगरमधील कर्जतच्या श्री अंबालिका शुगरला, तर उत्तर पूर्व विभागात लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी कारखाना. लातूर, उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार दक्षिण विभागात कोल्हापूरातील श्री दत्त शेतकरी ससाका.लि, मध्य विभागात श्री पांडुरंग ससाका लि. जि. सोलापूर, उत्तरपूर्व विभागात जालन्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ ससाका. लि, या कारखान्यांना देण्यात येणार आहे.

विभागवार तांत्रिक कार्यक्षमता दक्षिण विभाग प्रथम पुरस्कार विश्वासराव नाईक ससाका लि., मध्य विभाग प्रथम पुरस्कार सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात ससाका.लि कारखाना, उत्तरपूर्व विभाग प्रथम पुरस्कार रेणा ससाका लि. यांना जाहीर करण्यात आला आहे. विभागवार उकृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. दक्षिण विभागात श्री दत्त शेतकरी ससाका लि. जि. कोल्हापूर, मध्य विभागात श्री पांडुरंग ससाका लि. जि. सोलापूर, उत्तरपूर्व विभागात कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ ससाका लि. जि. जालना, यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या