Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे मनपाच्या बैठकीला उपस्थित असलेल्या महिला पदाधिकार्‍याच्या पतीलाच करोना

पुणे मनपाच्या बैठकीला उपस्थित असलेल्या महिला पदाधिकार्‍याच्या पतीलाच करोना

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेने आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित महिला पदाधिकार्‍याच्या पतीलाच करोनाफ झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे बैठकीला हजेरी लावलेल्या अधिकार्‍यांची धाकधूक वाढली होती. परंतु महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

- Advertisement -

सोमवारी दुपारी पुणे महापालिकेत करोनाफबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला महापौर, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सर्वपक्षीय गटनेते असे 30 ते 35 पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

बैठकीला उपस्थित राहिलेल्या एका महिला पदाधिकार्‍याच्या पतीचा करोनाफ रिपोर्ट सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला. संबंधित महिला दोन तास बैठकीला उपस्थित होती. तिने इतरांशी संवादही साधला होता. त्यामुळे बैठकीला उपस्थित अधिकारी-पदाधिकारी सध्या करोना भीतीच्या सावटाखाली होते. मंगळवारपासून सर्व पदाधिकारी घरातच थांबून होते.

बुधवारी सकाळी महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने पालिकेचे अधिकारी पदाधिकार्‍यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र महिलेच्या पतीला करोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याने तिला पुढील किमान सात दिवस होम क्वारंटाईन राहण्याची सूचना देण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा तिचा स्वॅब घेण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या