Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे : फळ आणि भाजीपाला मार्केट होणार सुरू

पुणे : फळ आणि भाजीपाला मार्केट होणार सुरू

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) -पुण्यात भुसार बाजारानंतर आता फळ आणि भाजीपाला मार्केट सुरू होण्याची शक्यता आहे. फळ, भाजीपाला मार्केट सुरू करण्यावर 28 तारखेला निर्णय होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या हा बाजार बंद आहे. मात्र मार्केट सुरू करण्यासंदर्भात मंगळवारी बैठक पार पडली.

- Advertisement -

मार्केट यार्ड प्रशासन, अडते असोसिएशन, टेम्पोचालक आणि कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत फळ आणि भाजीपाला पुर्ववत सुरू करण्यावर चर्चा झाली.

बैठकीत गर्दी टाळण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांवर सविस्तर चर्चा, दिवसाआड पद्धतीने फळे भाजीपाला उपलब्ध करून गर्दी टाळू शकतो. त्याचबरोबर मास्क वापरणं बंधनकारक, संपूर्ण मार्केट यार्ड परिसर निर्जंतुक केला जाईल, थर्मल गणने तापमान नोंदवून परवानाधारकांना आत मध्ये प्रवेश, या उपाययोजना करणार असल्याचं मार्केटयार्ड प्रशासनाने सांगितलं.

मार्केट यार्डचा प्रस्तावावर अडते असोसिएशन, टेम्पो चालक संघटना, कामगार संघटना आपल्या इतर सदस्यांशी बोलून निर्णय घेणार आहे. यासंदर्भात पुन्हा 28 तारखेला बैठक होणार आणि या बैठकीत कोणत्या तारखेला आणि कशा पद्धतीने मार्केट सुरू करायचं याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या