पुण्यात आज 99 जणांना करोनाची लागण
Featured

पुण्यात आज 99 जणांना करोनाची लागण

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यात आज दिवसभरात 99 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुणे विभागातील करोना रुग्णांची संख्या आता 2202 वर येऊन पोहोचली आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली. आतापर्यंत पुण्यात 119 जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर 543 जण करोनावर मात करत बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, पुढील आठ ते दहा दिवसांत करोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यताही दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केली आहे.

पुणे विभागात करोनामुळे जीव गमावल्यांची संख्या आता 127 वर पोहोचली आहे. सध्या करोना मृत्यू दर 5.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. 93 रुग्ण अति गंभीर स्थितीत आहेत. पुढील आठ ते दहा दिवसात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे, अशी भीती दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केली. त्यासाठी आम्ही रोज 800 ते 1000 नमुण्यांची चाचणी करण्याचे नियोजन करत आहोत.
शिवाय, ससून रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर प्लाझ्मा थेरेपीला परवानगी मिळाली आहे. एका रुग्णाने ब्लड डोनेटला परवानगी दिली आहे. त्याचा एनआयव्ही अहवाल आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होईल असे त्यांनी सांगितले.

करोनाच्या लढाईत आपले तीन लढवय्ये पोलीस आणि मनपा कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या वतीने त्या तिघांनाही मी श्रध्दांजली वाहतो. या बलिदानातून आपण काहीतरी शिकावं आणि प्रशासनाची मदत करावी. सोशल डिस्टन्स पाळावं, अशी विनंती म्हैसेकर यांनी पुणेकरांना केली. चार सनदी अधिकार्‍यांवर प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी जबाबदारी दिली आहे. करोनाग्रस्त भागातील लोकसंख्या शिफ्ट केली जात आहे. त्यांची तपासणी केली जात आहे, त्यांना मास्क पुरवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

परप्रांतीय पाच जिल्ह्यातून स्थलांतरित कामगार, विद्यार्थी आणि इतर नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची पूर्ण प्रक्रिया पाठवली जाणार आहे. कोणत्याही पदवी असलेल्या डॉक्टरचं प्रमाणपत्र लागेल. फक्त कोविड संदर्भातील लक्षणांची तपासणी करायची आहे. 1200 व्यक्ती असतील, तर त्यांच्यासाठी स्पेशल ट्रेन सोडायला आम्ही तयार आहे. मात्र, डेस्टिनेशन टू डेस्टिनेशन राहील, मधे कुठेही गाडी थांबणार नाही. तसेच, त्यांना सोशल डिस्टन्सचं पालन करुन, करोना संदर्भात योग्य काळजी घेऊन रवाना करण्यात येईल.

तर जिल्हाधिकार्‍यांनी वाईन शॉप सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारच्या सुचनांनुसार आहे. वाईन शॉप सुरू ठेवताना नियम पाळले जायला हवेत. जर नियम नाही पाळले तर वाईन शॉप लॉकडाऊन सुरू असेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो. जिल्ह्यातील उद्योग सुरू होणार असल्याने रस्त्यांवर वाहतूक वाढलेली दिसून येईल. पण याचा अर्थ लॉकडाऊन शिथिल झाला असं नाही. तर दारू खरेदी करण्यासाठी वाहन वापरता येणार नाही. नियमभंग करणार्यांवर कारवाई केली जाईल असे त7यन्नि स्पष्ट केले.
सर्व सामान्यांच्या वाहनांना पेट्रोल आणि डिझेल देण्यास परवानगी देण्याचा निर्णयामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल.

लॉक डाऊन काळात रुग्ण वाढत असल्यावर पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर प्रथम संपर्क आणि त्यानंतर इतर संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जाते. तर काही वेळा रुग्ण रुग्णालयात गेल्यावर तिथेही संसर्ग झाल्याची आढळून आल्याचे सांगितले. ससून रुग्णालयात इतर जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांना प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आलं. याच प्रकरणी रुबी हॉस्पिटल नाही नोटीस बजावल्याचे त्यांनी सांगितलं.
पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी शहरात आतापर्यंत 11 पोलीस कोरोणा लागण झाली आहे. त्यापैकी एक मृत आहेत. या पोलिसांना घरापासून लागण झाली आहे,पोलिसांना कामाच्या ठिकाणी लागण झाली नसल्याचं सांगितलं. तर 1219 विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी परवानगी दिल्याचं सांगितलं.

Deshdoot
www.deshdoot.com