पुण्यातील करोनाग्रस्तांची संख्या 1538 वर ; 230 जणांची करोनावर मात

पुण्यातील करोनाग्रस्तांची संख्या 1538 वर ; 230 जणांची करोनावर मात

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे जिल्हयातील करोना बाधीत रुग्णांची संख्या बुधवारी संध्याकाळपर्यंत 1538 झाली आहे तर आतापर्यंत 230 करोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 1223 असून पुणे जिल्हयात करोनाबाधीत एकुण 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 79 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

पुणे विभागातील करोना बाधीत रुग्णांची संख्या 1702 झाली आहे.विभागातील 264 करोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 1344 आहे.विभागात करोनाबाधीत एकुण 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 80 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 17747 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 16908 चा अहवाल प्राप्त आहे. 839 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 15151 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1702 चा अहवाल पॉजिटिव्ह आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com