Sunday, May 5, 2024
Homeनगरप्राथमिक शिक्षकांची जिल्हा परिषदेसमोर धरणे

प्राथमिक शिक्षकांची जिल्हा परिषदेसमोर धरणे

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याच्या निषेधार्थ शिक्षकांनी घोषणा देत आपल्या भाषणातून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला.

- Advertisement -

या आंदोलनात राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले, जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, आर.पी.रहाणे, विकास डावखरे, राम निकम, दत्ता गमे, तुषार तुपे, सुभाष गरुड, गणेश वाघ, कल्याण राऊत, सुनिल पवळे, अंबादास गारूडकर, अलकाताई काळे आदींसह शिक्षक उपस्थित होते.

राज्य शिक्षक परिषद प्राथमिक ही शासन मान्यताप्राप्त व शासन निर्णयानुसार श्रमिक संघ यांच्याकडे नोंदणी झालेली अधिकृत संघटना आहे. प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न पाठपुरावा करुन देखील प्रश्न सुटत नसल्याने संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा परिषदे समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या शिक्षक व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, डी.सी.पी.एस. धारकांच्या कपातीचे पूर्ण व अचूक अद्ययावत हिशोब व सातव्या वेतन आयोगाची थकबाकी सर्व जिल्हा परिषदांनी अदा करावी, मृत कुटुंबीयांना 10 लाख रुपये तातडीने मदत मिळावी, जिल्हा स्तरावर पंचायत समिती स्तरावरून अग्रेषित झालेले सर्व प्रकारचे प्रस्ताव आवक क्रमांक व दिनांक नुसारच क्रमाने निकाली मंजूर करण्यात यावेत.

प्राथमिक शिक्षकांचे निलंबन, बडतर्फ करण्यापूर्वी सदर शिक्षकाला त्याची पूर्ण बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी, वैद्यकीय प्रस्ताव मंजुरी बाबत एक लाखाच्या आतील प्रस्तावांना तांत्रिक मंजुरीसाठीचे अधिकार पंचायत समिती स्तरावर तालुका आरोग्य अधिकार्‍यांना प्रदान करण्यासह राज्य व जिल्हा स्तरांवरील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या