शिर्डी : अन्य जिल्ह्यांतून डोर्‍हाळे येथे आलेल्या 123 जणांची प्राथमिक तपासणी ; 15 कोरोंटाईन
Featured

शिर्डी : अन्य जिल्ह्यांतून डोर्‍हाळे येथे आलेल्या 123 जणांची प्राथमिक तपासणी ; 15 कोरोंटाईन

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

कोर्‍हाळे (वार्ताहर) – देशभरात कोरोनाची लागण होऊन दुसरा टप्पा सुरु झाल्याने प्रशासन व नागरिक यांच्यात कोरोना या विषाणू बाबत मोठी दहशत आढळून येत आहे. परदेशातून, परराज्यातून तसेच मोठ्या शहरातून आपल्या मायभूमीत डोर्‍हाळे परिसरातील गावात आलेल्या 123 जणांची डोर्‍हाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली असता 15 नागरिकांना 14 दिवस कोरोंटाईमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना विषाणूने थैमान घातले असून त्या पार्श्‍वभूमीवर परदेशातून आलेले नागरिक.मुंबई-पूण्यातून आलेले नागरिक यांची नोंद स्थानिक प्रशासनास ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. नाशिक, पिंपरी चिंचवड, मुंबई, नाशिक या परजिल्ह्यातून राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे, डोर्‍हाळे, वाळकी, कनकुरी, नांदुर्खी या परिसरातील ग्रामपंचायत व आरोग्य केंद्राने चौकशी केली असता अशा 123 नागरिकांची डोर्‍हाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली होती. त्यांना या विषाणूंचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही. परंंंंतु तरीही सुरक्षेच्यादृष्टीने यातील 15 नागरिकांच्या हातावर होम कोरोनटाईन शिक्का मारून 14 दिवसापर्यंतपर्यंत होम कोरोटाईन होण्यास सांगितले आहे.

अद्यापही परजिल्ह्यातून तसेच परराज्यातून कोणी नागरिक या परिसरात आले असतील त्यांनी स्वतःहून डोर्‍हाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. होमकोरोटाईनचे शिक्के मारलेल्या नागरिकांनी आपल्या घरातच थांबावे. आपल्या घरी असणारे आपले मुलं-मुली, घरातील ज्येष्ठ नागरिक तसेच नातेवाईक यांनी या व्यक्तींपासून दूर राहावे. तसेच आपले कपडे, इतर उपयोगी साहित्य हे घरातील इतरांपासून वेगळे ठेवावे . तोंडाला मास्क रुमाल बांधावे, हात नेहमी स्वच्छ धुवावे तसेच नॉर्मल सर्दी, खोकला, ताप यासारखे लक्षणे आढळून आल्यास निष्काळजीपणा दुर्लक्ष करू नये. तात्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. एखादा आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा दक्षता घ्यावी, असे मत डोर्‍हाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गायकवाड यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. डोर्‍हाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी, परिचारिका इतर कर्मचारी वर्ग तसेच या केंद्राअंतर्गत येणार्‍या उपकेंद्रातील परिचारिका, आशासेविका या सर्वांना कोरोना संसर्गजन्य रोगासंदर्भातील रुग्णांची घ्यावयाची काळजी याबाबत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तसेच नागरिकांनीही सतर्क राहून घराच्या बाहेर पडू नये.
डॉ. संजय गायकवाड
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, डोर्‍हाळे

Deshdoot
www.deshdoot.com